agriculture news in marathi, crisis in orange crop, akola, maharashtra | Agrowon

संत्र्याची झाडे पिवळी पडल्याने बागायतदार चिंतेत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

अकोला : मृग बहराने दगा दिल्याने संत्रा उत्पादक कमालीचे अार्थिक अडचणीत अाले अाहेत. या संकटातून सावरत पुढील हंगामाकडे अाशेने पाहत असलेल्या संत्रा उत्पादकांसमोर आता नवीन समस्या उभी राहली अाहे. संत्र्याची झाडे पिवळी पडत असल्याने अागामी बहरावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो, असे शेतकरी सांगत अाहेत.

वऱ्हाडात संत्रा पिकाच्या बागा दरवर्षी वाढत अाहेत. शेतकरी एक ठोस व अाश्वासक पीक म्हणून याकडे वळत अाहेत. असे असतानाच इतर पिकांप्रमाणे संत्रा उत्पादकांपुढे अाता विविध अडचणी येत अाहेत. सध्या संत्र्याची नवीन तसेच जुनी झाडे पिवळी पडत अाहेत.

अकोला : मृग बहराने दगा दिल्याने संत्रा उत्पादक कमालीचे अार्थिक अडचणीत अाले अाहेत. या संकटातून सावरत पुढील हंगामाकडे अाशेने पाहत असलेल्या संत्रा उत्पादकांसमोर आता नवीन समस्या उभी राहली अाहे. संत्र्याची झाडे पिवळी पडत असल्याने अागामी बहरावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो, असे शेतकरी सांगत अाहेत.

वऱ्हाडात संत्रा पिकाच्या बागा दरवर्षी वाढत अाहेत. शेतकरी एक ठोस व अाश्वासक पीक म्हणून याकडे वळत अाहेत. असे असतानाच इतर पिकांप्रमाणे संत्रा उत्पादकांपुढे अाता विविध अडचणी येत अाहेत. सध्या संत्र्याची नवीन तसेच जुनी झाडे पिवळी पडत अाहेत.

यासंदर्भात शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे संपर्क साधला. त्यानंतर विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. दिनेश पैठणकर, योगेश इंगळे, तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे, कृषी सहायक बैरागी यांनी अकोट तालुक्यातील संत्रा बागांना भेटी दिल्या. या वेळी शेतकरी तुळशीराम ईस्तापे, देविदास बुले, गोकुळ लटकुटे, सरपंच संजय ताडे, अशोक ताडे, दादा गायकी, महादेव गावंडे, दीपक अातकड यांच्याकडून तज्ज्ञांनी माहिती घेताना पीक व्यवस्थापनाच्या उपाययोजना सांगितल्या.

गेल्या वर्षीपासून संत्रा उत्पादक शेतकरी सातत्याने संकटांना सामोरे जात अाहेत. कधी बहर फुटतो, तर भाव मिळत नाही अाणि बाजारात भाव मिळाले तर बगीचा फुटत नाही. विमा काढूनही नुकसान भरपाई मिळत नाही. बऱ्याच बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस व्यवस्थापन खर्च वाढत असल्याचे शेतकरी सांगतात.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...