agriculture news in marathi, criteria to start government repurchase center | Agrowon

खरेदी केंद्र मिळविण्यासाठी आता निकष परीक्षा
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

अकोला : शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी यापुढे निकष परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार असून, आवश्‍यक मनुष्यबळ सेवा व तांत्रिक योग्यता असेल, अशाच ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. याबाबत निकषपूर्तता तपासणीची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांकडे सोपविण्यात आली आहे. 

अकोला : शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी यापुढे निकष परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार असून, आवश्‍यक मनुष्यबळ सेवा व तांत्रिक योग्यता असेल, अशाच ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. याबाबत निकषपूर्तता तपासणीची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांकडे सोपविण्यात आली आहे. 

काही वर्षांपासून शासकीय शेतीमाल खरेदी केंद्रांवर सुरू असलेला गोंधळ शेतकऱ्यांसाठी मोठा डोकेदुखी ठरत आहे. प्रत्यक्ष शेतीमाल विक्रीपूर्वी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी. निर्धारित आर्द्रतेचा, गुणवत्तेचा शेतीमालच हमीभावात खरेदी, प्रति एकरी शेतीमाल खरेदी मर्यादा, कागदपत्रांचे निकष वेगळेच. यानंतरही खरेदी केंद्रांवर आवश्‍यक मनुष्यबळ सेवा किंवा तांत्रिक योग्यतेच्या अभावाने वर्षोगणती, उत्पादित शेतीमालापैकी निम्मा मालही शासकीय केंद्र खरेदी करू शकले नाही. एका बाजूला सरकारने शेतकऱ्यांसाठी ठरवून दिलेले जाचक निकष व दुसरीकडे केंद्रांवर भेडसाविणाऱ्या तांत्रिक व मनुष्यबळ उपलब्धतेच्या समस्या शासकीय शेतीमाल खरेदीतील मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे यापुढे ज्या ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र सुरू करायचे असेल, त्या ठिकाणी आधी खरेदी-विक्री संघाला मनुष्यबळ सेवा व इतर निकषांची हमी द्यावी लागणार आहे. 

शासकीय शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत अद्याप शासनाकडून निर्देश मिळाले नाहीत. परंतु आवश्‍यक मनुष्यबळ सेवा व तांत्रिक योग्यता सिद्ध करणाऱ्या ठिकाणीच केंद्र देण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांना शासनाचे निर्देश असल्याची माहिती आहे. 
- राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला 

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...