Agriculture news in Marathi, Crop advisory, sigatoka on banana, AGROWON | Agrowon

केळीवरील करपा रोगाचे करा नियंत्रण
आर. व्ही. देशमुख
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

 

केळी पीक सल्ला
---------------------
सध्याच्या वातावरणात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोग नियंत्रणाकरिता खालील उपाय करावेत

लक्षणे ः

 

केळी पीक सल्ला
---------------------
सध्याच्या वातावरणात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोग नियंत्रणाकरिता खालील उपाय करावेत

लक्षणे ः

 •  खालील पानांवर सुरवातीला लक्षणे दिसतात. पानांवर लहान पिवळसर लंबगोलाकार ठिपके कालांतराने ते मोठे होऊन आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा होतो. ठिपक्‍याभोवती पिवळ्या रंगाचे वण दिसतात. 
 •  झाडावर कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. त्यामुळे घडांचे पोषण व्यवस्थित होऊ शकत नाही. परिणामी घडावरील फळे आकाराने लहान राहतात. फळातील गर अकाली पिकतो.

प्रसार ः

 • कंद, रोप, हवेतून. 
 • विषाणूचा प्रसार पानांवरील दवबिंदूद्वारे.  
 • उष्णतामान २१ ते २५ अंश से. तसेच कमाल सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत असेल तर रोगाचा प्रादुर्भाव होतो.

रोगास अनुकूल बाबी 

 • रोगग्रस्त बागेतील कंदांचा वापर.
 • शिफारशीत बेणेप्रक्रियेचा अभाव.
 • पीक फेरपालटीचा अभाव.
 • शिफारशीपेक्षा कमी अंतरावर लागवड.
 • पावसाच्या पाण्याचा अयोग्य निचरा.
 • बागेमध्ये व सभोवताली सर्वसाधारण स्वच्छतेचा अभाव.
 • नियंत्रण ः

अ) प्रतिबंधात्मक

 • लागवड, ओढे, नदीकाठावरील चिबड जमिनीत करु नये.
 • कंदापासून लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या मुनव्याचे वय ३ ते ४ महिन्यांचे असावे. त्याची पाने तलवारीच्या पात्यासारखी अरुंद असावीत. तसेच त्यापासून काढलेल्या कंदाचे वजन ५०० ते ७५० ग्रॅम असावे. कंद रोगमुक्त मुनव्यापासून काढलेला असावा.
 • लागवड शिफारशीत अंतरावर (१.५ मी.x १.५ मी.) किंवा जमिनीच्या मगदुराप्रमाणे करावी.
 • लागवडीपूर्वी कंद प्रक्रियाः १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १५० ग्रॅम ॲसिफेट प्रति १०० लिटर पाण्यात द्रावण करुन त्यात कंद किमान अर्धा तास बुडवून ठेवावेत. 
 • शिफारशीत खत मात्रांचा अवलंब ः  २०० ग्रॅम नत्र, १६० ग्रॅम स्फुरद, २०० ग्रॅम पालाश प्रतिझाड अशी खतमात्रा वेळापत्रकानुसार द्यावी. रासायनिक खतांबरोबरच प्रति झाड १० किलो शेणखत, १५ ग्रॅम अझोस्पिरीलम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक जमिनीत मिसळून द्यावे.
 • बागेतील वाळलेली, पिवळी, रोगग्रस्त पाने तसेच झाडालगतची पिले नियमित कापावीत. त्यांची बागेबाहेर विल्हेवाट लावून बाग स्वच्छ ठेवावी.
 • बागेमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढावा. बाग नेहमी वाफसा स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.
 • ठिबक सिंचनाचा वापर करावा.
 • बागेत खेळती हवा राहील अशी व्यवस्था करावी.

ब) बुरशीनाशकांचा वापर

 •  उती संवर्धित रोपे ः  लागवडीनंतर एक ते सव्वा महिन्याने
 • १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणात द्रावण तयार करून प्रतिझाड २०० मि. लि. याप्रमाणे आळवणी 
 • रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर विल्हेवाट लावावी. 
 • फवारणी ः कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक मिनरल ऑईल १० मि.लि. अधिक सर्फेक्टंट १ मि. लि. प्रतिलिटर पाणी. 
 • दुसरी फवारणी १५ दिवसांनी ः प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक मिनरल ऑईल १० मि.लि. अधिक सर्फेक्टंट १ मि.लि. प्रतिलिटर पाणी 
 • पुढील फवारण्या गरजेनुसार. बुरशीनाशकांचा आलटून पालटून वापर करावा.
 • फवारणी ः नॅपसॅक पंपाद्वारे करावी.  

 : आर. व्ही. देशमुख, ९४२१५६८६७४ (केळी संशोधन केंद्र, नांदेड)
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रोगाईड
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
सुपीकता टिकवण्यासाठी संवर्धित शेतीपारंपरिक शेतीपासून किमान मशागत ते शून्य मशागत हा...
पानवेल व्यवस्थापन सल्लासद्यःस्थितीत पानवेलीच्या शेतात आंतरमशागत, वेलीची...
चिकू पीक सल्लाचिकू फळबागेत येत्या दीड महिन्याच्या कालावधीत...
लिंबूवर्गीय फळपीक सल्लासध्या तापमानात वाढ होत असल्यामुळे ७ ते १०...
राज्यात उष्ण, ढगाळ हवामान राहण्याची...या आठवड्यात भारतातील हवेचे दाबात बदल होत असून...
भाजीपाला पीक सल्लामिरची    गादीवाफ्यावरील रोपांची मुख्य...
कोबीवर्गीय भाजीपाला पिकांवरील किडींचे...कोबीवर्गीय भाजीपाला पिकावर सद्यस्थितीत काळी माशी...
मशागतीद्वारे मातीचे व्यवस्थापनमशागतीचे अनेक फायदे असले तरी गेल्या शतकामध्ये...
योग्य व्यवस्थापनाने केळी खोडवा फायदेशीरराज्यात केळीचा खोडवा पीक घ्यावयाची पद्धत नव्हती....
नारळ बागेत ठेवा स्वच्छतापहिली दोन वर्षे नारळ रोपांना विणलेले झाप, झावळ्या...
फुलोरा, चिकाच्या अवस्थेत गव्हास पाणी...सद्यःस्थितीत शेतात वेळेवर पेरणी केलेला व उशिरा...
सीताफळाचा उन्हाळी बहर घेताना...यंदा उन्हाळ्यातही सीताफळ फळपिकाला पाणी पुरेल अशी...
ऊस खोडवा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष नको...राज्यामध्ये उसाखालील क्षेत्रापैकी अंदाजे ४० ते ४५...
ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचे...ठिबकमधून विद्राव्य खतांची मात्रा देण्यापूर्वी...
सीताफळ बागेचे उन्हाळी पाणी व्यवस्थापनउन्हाळ्यात सीताफळ बागेच्या नवीन हंगामासाठी छाटणी...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी वेळेत...या वर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक...
द्राक्षबागेत रिकटवेळी घ्यावयाची काळजीसध्याच्या वाढत्या तापमानामध्ये द्राक्षबागेमध्ये...
शिफारशीनुसार द्या शेवग्याला खतमात्राशेवगा पिकाला शेणखताबरोबरच माती परीक्षणानुसार...
पीक व्यवस्थापन सल्लाकापूस : पऱ्हाट्या लवकरात लवकर उपटून टाकाव्यात....