agriculture news in marathi, crop become in trobule due to lack of rain, varhad, maharashtra | Agrowon

अकोला, बुलडाणा जिल्ह्यात कमी पावसामुळे पिके अडचणीत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

अकोला ः गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झालेला असला, तरी सार्वत्रिक पाऊस नसल्याने याही हंगामात मागील वर्षांप्रमाणे पेरण्यांमध्ये तफावत झाल्याचे दिसून येत अाहे. जूनच्या पहिल्या अाठवड्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके अडचणीत अाल्याची बाब समोर अाली अाहे.

अकोला ः गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झालेला असला, तरी सार्वत्रिक पाऊस नसल्याने याही हंगामात मागील वर्षांप्रमाणे पेरण्यांमध्ये तफावत झाल्याचे दिसून येत अाहे. जूनच्या पहिल्या अाठवड्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके अडचणीत अाल्याची बाब समोर अाली अाहे.

अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, तर बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, चिखली, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यांतील पेरण्यांची स्थिती दरदिवसाला बिकट होत चालली अाहे. बुलडाणा जिल्ह्यात घाटावरील काही क्षेत्रात उभी पिके सुकत असून शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपड करीत अाहेत. सिंचनाची व्यवस्था असलेल्या भागात पिके वाचवण्यासाठी एेन पावसाळ्यात तुषार सिंचनाचा अाधार घ्यावा लागत अाहे. मात्र कोरडवाहू शेतांमधील पिकांसमोरील अडचणी दर दिवसा वाढत अाहेत. असंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय राहिलेला नाही.

वऱ्हाडात मृग नक्षत्रात पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्याच अाठवड्यात पेरण्यांना सुरवात केली. त्यानंतर दोन वेळा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिके उगवली व चांगल्या पद्धतीने ताशी लागली. अाता मात्र पावसामध्ये मोठा खंड पडला अाहे. सिंदखेडराजा, देऊळगावराजा यासह अन्य तालुक्यांत दोन पावसांतील खंड २० ते २५ दिवसांपेक्षा अधिक झाला अाहे. पेरणी करून पिके उगवलेल्या शेतात पावसाअभावी बिकट स्थिती अाहे. जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर ज्यांनी पहिल्याच टप्प्यात पेरणी केली अशांपैकी अनेकांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. बीटी कपाशी उगवलेली नाही. सोयाबीन, मूग, उडीद ही पिकेही तशीच अधांतरीच अाहे.

सार्वत्रिक अाणि दमदार पाऊस नसल्याने पेरण्यांचे याहीवर्षी टप्पे पडत अाहेत. काही भागांत नियमितपणे पावसाने हजेरी लावल्याने तेथील पेरण्या साधल्या. पिके अाज एक महिना कालावधीची झाली. हे शेतकरी कोळपणीच्या कामात व्यग्र अाहेत. मात्र दुसरीकडे कमी पावसामुळे हजारो हेक्टरवर पेरण्याच होऊ शकलेल्या नाहीत. जमीन तशीच पडून अाहे.

अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पेरण्यांची टक्केवारी अद्यापही ५०च्या अातच अाहे. प्रामुख्याने बुलडाणासारख्या मोठ्या जिल्ह्यात पेरणीयोग्य लाखो हेक्टर क्षेत्र पडून अाहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम अाहे. देऊळगावराजा येथे जून महिन्यात चार दिवस पाऊस झाला असून, तो जून महिन्यातील सरासरीच्या ३०.९ टक्के एवढा कमी अाहे.

सिंदखेडराजामध्येही अशीच स्थिती अाहे. या तालुक्यात सरासरी ४ दिवस पाऊस झाला तर त्याची टक्केवारी ३० अाहे. वऱ्हाडात सर्वात कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात अवघा २० टक्के एवढा पडला. या तालुक्यात अवघा चार दिवस पाऊस झाला. हा तालुका दुष्काळी जाहीर झालेला असून, या वर्षी आतापर्यंत पावसाने ओढ दिली अाहे. नांदुरामध्ये ५० टक्के पाऊस झाला असून, तो पाच दिवस पडला. तेल्हारा तालुक्यात ५९ टक्के पाऊस ६ दिवसांत पडला. ही सरासरी भरून निघण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागली अाहे.
 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...