agriculture news in marathi, crop cultivation stop due to rain, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी ठप्पच
चंद्रकांत जाधव
रविवार, 15 ऑक्टोबर 2017
 
सोयाबीन, ज्वारीची कापणी रखडली आहे. त्यातच पावसाची भीती आहे. मजूर मिळत नसल्याने हार्वेस्टरला पसंती दिली जात आहे. पण सध्या वाफसा नसल्याने हार्वेस्टरही शेतात काम करू शकत नाहीत. 
- मच्छिंद्र पाटील, शेतकरी, रेल, जि. जळगाव.
जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये हवा तसा वाफसा नसल्याने सोयाबीन व ज्वारी कापणीची कामे जवळपास ठप्पच आहेत. त्यातच सोयाबीन काढणीच्या कामासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या हार्वेस्टरधारकांनाही रोजगार नसल्याचे चित्र आहे. 
 
कापणीवर आलेल्या सोयाबीनचा कोरडा पाला पावसामुळे गळून गेला आहे. शेंगा ओल्या असून, शेतातही चिखल असल्याने वाफसा नाही. त्यामुळे मजूरही कापणी करू शकत नाहीत. चोपडा, जळगाव, यावल भागांत सोयाबीन अधिक असून, कापणी रखडल्याने नुकसानीची भीतीही वाढत आहे.
 
कापणी झाली असती तर सोयाबीन गोळा करून त्याचे ढीग शेतात लावण्याचेही काम झाले असते. या ढिगांवर ताडपत्री झाकून त्याचा बचाव पावसापासून करणे शक्‍य होते. परंतु कापणीअभावी सोयाबीन शेतात तसाच उभा आहे. थोडा पाऊस आला तरी शेंगांचा दर्जा घसरत आहे. शेंगा फुगून त्यातून कोंब निघण्याची स्थिती सध्या आहेत. त्यातच आता दिवाळीमुळे मजूरही मिळणे दुरापास्त झाले आहे. 
 
जशी सोयाबीनची स्थिती आहे, तशीच स्थिती ज्वारीचीदेखील आहे. ज्वारीदेखील कापणीवर आली आहे. जिल्ह्यात रावेर, यावल, चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात ज्वारी आहे. धरणगाव, रावेर, यावल व चोपडा भागात बेवड म्हणून ज्वारीची पेरणी अधिक केली जाते. परंतु पावसामुळे ज्वारीची कापणीही जवळपास बंदच आहे. मुरमाड, हलक्‍या जमिनींच्या भागात ज्वारीची कापणी करून घेतली जात आहे. 
 
जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा भागांत अनेक हार्वेस्टरधारक सोयाबीन काढणीसाठी आले आहेत. दिवाळीपूर्वी दरवर्षी ते दाखल होतात. परंतु सध्या वाफसा नसल्याने हार्वेस्टरही शेतात जाऊ शकत नाही. रस्तेही चिखलमय झाले आहेत. हार्वेस्टरने काढणीसाठी पाऊस थांबल्यानंतर किमान १० दिवस कोरड हवी आहे. 

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...