अतिवृष्टीचा अकोला जिल्ह्यात ३००० हेक्टरला तडाखा

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

अकोला : गेल्या अाठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा अकोला जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरला बसल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात अाला असून, प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतर यात अाणखी वाढीची शक्यता अाहे. अद्यापही दुर्गम भागातील माहिती अंतिम स्वरूपात तयार झालेली नाही. जिल्ह्यात प्रामुख्याने मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालेले अाहे.   

जिल्ह्यात गेल्या अाठवड्यात तीन दिवस ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे सर्वच नदी-नाले अोसंडून वाहले. काही ठिकाणी पाणी शेतांमध्ये शिरले. त्यामुळे जमीन खरडली असून पिकांचेसुद्धा अतोनात नुकसान झाले. प्रामुख्याने नद्यांना मोठे पूर मूर्तिजापूर तालुक्यात वाहले. यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन पूर्णत: पाण्यात बुडाली होती. अाता पावसाचा जोर अोसरल्यानंतर पूरसुद्धा कमी झाले अाहेत. यामुळे नुकसानीचे चित्र स्पष्ट व्हायला सुरवात झाली.

महसूल, कृषी विभागाचे अधिकारी प्राथमिक अंदाज घेत अाहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील १६४० हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. या तालुक्यात पूर्णा, काटेपूर्णा, उमा आणि कमळगंगा नद्यांना मोठे पूर वाहले होते. सोयाबीन, कापूस, तूर व मूग या पिकांची पुराच्या पाण्याने नासाडी केली. मूर्तिजापूर पाठोपाठ अकाेला तालुक्यात ९७२ हेक्टरचे नुकसान झालेले अाहे. त्याशिवाय बार्शीटाकळी १०० अाणि बाळापूर तालुक्यातही सुमारे २५० हेक्टर असे एकूण २९६० हेक्टरचे नुकसान झाले अाहे. जोरदार पावसामुळे शेतजमिनीसोबच सुमारे सव्वाशे घरांचीसुद्धा पडझड झाली.

पावसाची रिपरिप सुरूच

गेल्या अाठवड्यात सक्रीय झालेला पाऊस अद्यापही कमी अधिक प्रमाणात कायम अाहे. गेल्या २४ तासात अकोला जिल्ह्यात १३७ मिलिमीटर तर सरासरी १९.६ मिलिमीटर पाऊस नोंद झाली. बार्शीटाकळी तालुक्यात सर्वाधिक २९.१ मिली तर मूर्तिजापूरमध्ये सर्वात कमी १२ मिली पाऊस झाला.  बुलडाणा जिल्हा जिल्ह्यात १४१.५ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरी १०.९ मिलिमीटर हा पाऊस आहे. वाशीम जिल्ह्यातही सार्वत्रिक पावसाची नोंद झालेली अाहे. या जिल्ह्यात एकूण ६०.६३ मिलिमीटर पाऊस झाला असून तो सरासरी १० मिली एवढा ठरला.

असे झाले नुकसान (हेक्टर) ः मूर्तिजापूर १६४०, अकाेला ९७२, बार्शीटाकळी १००, बाळापूर २५०, एकूण २९६२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com