agriculture news in marathi, crop damage due to heavy rain, yavatmal, maharashtra | Agrowon

अतिवृष्टीमुळे यवतमाळमधील ४६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

यवतमाळ  : काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४६ हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यात २२ हजार हेक्‍टरवरील कापसाचे नुकसान झाले असून, ९३३ हेक्‍टरवरील पीक खरडून गेली. कापूस पिकासह मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकांलाही जास्त पावसाचा फटका बसला आहे.

यवतमाळ  : काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४६ हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यात २२ हजार हेक्‍टरवरील कापसाचे नुकसान झाले असून, ९३३ हेक्‍टरवरील पीक खरडून गेली. कापूस पिकासह मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकांलाही जास्त पावसाचा फटका बसला आहे.

यंदा खरीप हंगामातील पिके समाधानकारक स्थितीत आहे. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांना संजीवनी दिली असली तरी त्यानंतर झालेल्या जास्त पावसाने धोकादेखील निर्माण झाला आहे. मागील हंगामात बोंडअळी, कमी पावसाने पिके उद्‌ध्वस्त झाली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. यंदा समाधानकारक पाऊस असल्याने पिकांची स्थिती चांगली होती. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकांना मोठा फटका बसला.

जिल्ह्यातील दारव्हा, उमरखेड, महागाव, पुसद, यवतमाळ, दिग्रस, आर्णी, पांढरकवडा, झरी व वणी तालुक्‍यांतील पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेली तब्बल ६३२ हेक्‍टर शेतजमीन खरडून गेली. आठवड्याभरापासून शेती नुकसानीचे पंचनामे सुरू असून, यंत्रणा कामाला लागली आहे.

जास्त पावसाने दारव्हा तालुक्‍यात नऊ हजार, उमरखेड तालुक्‍यात ७८११, महागाव तालुक्यात नऊ हजार ५६२, पुसद तालुक्यात पाच हजार ५६५, घाटंजी तालुक्यात दोन हजार, आर्णी तालुक्यात पाच हजार ४२५, दिग्रस तालुक्यात नऊ हजार ७००, पांढरकवडा तालुक्यात ८२ तर झरी तालुक्यातील दोन हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश
अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले. कृषी व महसूल विभागाचे संयुक्त पंचनामे सुरू झाले असून, तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले.

नुकसानीची टक्केवारी महत्त्वाची
शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर पंचनामे सुरू झाले असून, त्यात नैसर्गिक आपत्ती निकषानुसार मदत दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी नुकसानीची टक्केवारी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे कोण त्या टक्केवारीत बसणार, ही महत्त्वाची बाब आहे.

इतर अॅग्रो विशेष
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...