बुलडाण्यात नदीकाठावरील पिकांचे नुकसान
गोपाल हागे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017
अकोला :  बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. या पावसामुळे बुलडाणा तालुक्यातील नद्यांना पूर आला. या पुरांमुळे जीवितहानी झाली नसली, तरी नदीकाठांवरील शेतांमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले.
 
अकोला :  बुलडाणा व अकोला जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. या पावसामुळे बुलडाणा तालुक्यातील नद्यांना पूर आला. या पुरांमुळे जीवितहानी झाली नसली, तरी नदीकाठांवरील शेतांमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले.
 
बुलडाण्यात पुराच्या पाण्यात एक म्हैस वाहून गेल्याची माहिती मिळाली अाहे. दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात उमरा व पणज या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. पणजमध्ये या मोसमात सर्वाधिक १२० तर उमरा मंडळांत १०० मिमी पाऊस नोंदविला गेला. पावसामुळे या भागातील पूर्वहंगामी कापूस अोला झाला. सोंगणी केलेल्या सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले अाहे.  
 
वऱ्हाडात गेले तीन दिवस पावसाळी वातावरण होते. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. मंगळवारी (ता. १०) दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात सर्वच नदी-नाल्यांना पूर आले. धाड येथील बाणगंगा नदीला मोठा पूर गेला. यामुळे करडी धरण एकाच पुरात अोव्हरफ्लो झाले. बाणगंगेचे पाणी धाड-धामणगाव रस्त्यावरील पुलावरून वाहल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला होता. जवळपास तीन ते चार तास पाणी वाहत होते. या पुरामुळे नदीकाठावरील शेतातील पिकांचे नुकसान झाले अाहेत. 
 
धाड येथील गणेश बंडू गायकवाड यांची तीन एकरांतील सोंगणी केलेला मका पुरात वाहून गेला. यामुळे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. शिवाय स्प्रिंकलर सेट (३० हजार), मोटर पंप (२० हजार) असे मिळून दोन लाखांचे नुकसान झाले. इतर शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. सोंगणी केलेल्या सोयाबीनच्या सुड्यांमधून कोंब बाहेर निघू लागले अाहेत. या नुकसानीचा प्रशासनाकडून अाढावा घेण्याची प्राथमिक सूचना देण्यात अाली अाहे. 

इतर अॅग्रो विशेष
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...
लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला...जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून...
दुग्धव्यवसायाला दिशा देणारे मॉडर्न...आदर्श व्यवस्थापन (उदा. मुक्त गोठ), आधुनिक...
एकमेका करू साह्य, अवघे धरू सुपंथआजच्या काळातील शेतीतील समस्या पाहिल्या तर...
अनेक कीटकनाशकांवर जगात बंदी; भारतात...नागपूर : मोनाक्रोटोफॉस हे जहाल कीटकनाशक आहे....
संत्र्याचा पीकविमा कर्जखात्यात केला जमाअकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली...
बिगरनोंदणीकृत उत्पादने विक्रीवर बंदी...पुणे : कीटकनाशके कायद्यानुसार नोंदणी नसलेली...
महिला शेतकरी कंपनीने थाटला डाळमिल...बुलडाणा ः जिल्ह्यातील महिलांची असलेल्या...
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...