जळगाव जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान
चंद्रकांत जाधव
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017
या पावसामुळे काही भागांत केळी, पूर्वहंगामी कपाशीचे नुकसान झाले आहे. परंतु, कोरडवाहू कपाशीला दिलासा मिळाला आहे. आमच्या भागात शनिवारी (ता.७) वादळी पावसाने पिके आडवी झाली होती. 
- नाना पाटील, शेतकरी, पिंप्री खुर्द, जि. जळगाव. 
जळगाव : पावसामुळे वेचणीवर आलेल्या कपाशीसह सोयाबीन, केळी पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पडून हानी झाली असून, ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परंतु, हा पाऊस रब्बी हंगामासाठी काहीसा लाभदायक असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
जिल्ह्यात मागील दोन, तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणाच्या भीतीने वेचणीवर आलेल्या कापसाच्या शेतात मजुरांची संख्या शेतकऱ्यांनी वाढवून घेतली. अधिक मजुरीचे देण्याचे वायदे या वातावरणामुळे शेतकऱ्यांना करावे लागले. अशातच शनिवारी (ता.७) व रविवारी (ता. ८) जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.  जामनेर, धरणगाव, चाळीसगाव, जळगाव आदी ठिकाणी पाऊस झाला.
 
रविवारी मध्यरात्रीनंतर जळगाव लगतच्या भागात जोरदार सरी कोसळल्या. सुसाट वारा नव्हता, पण पावसामुळे उमललेली बोंडे काळवंडली आहेत. तसेच कपाशी लोळू लागली आहे. जवळपास तासभर पाऊस झाला. अनेक ठिकाणी मका काढणीवर आल्याने कणसे खुडण्याचे काम सुरू होते. तर अनेक ठिकाणी ज्वारीची कापणी सुरू झाली होती. रावेर, यावल, चोपडा भागात ज्वारीची कापणी काही शेतकऱ्यांनी केली होती. मका व ज्वारी जमिनीवर पडले आहेत. त्यावर पाऊस झाल्याने ते भिजून नुकसान झाले आहे. पुन्हा पाऊस आला तर ज्वारीला कोंब फुटतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
 
पण कोरडवाहू कपाशी, ताग या पिकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे मात्र रब्बी हंगामातील पेरणीला आणखी वेग येऊ शकतो. अनेकांनी रब्बीसाठी शेती तयार केली होती. पुरेसा ओलावा हवा होता. तो या पावसाने मिळाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहेत. 
 
धरणगाव तालुक्‍यातील साकरे, साळवा, पिशाणे, पिंपळे, अमळनेर तालुक्‍यातील निमझरी, दहिवद, सोनखेडी, एरंडोल तालुक्‍यातील कासोदा, आडगाव, उमरे, सोनबर्डी, हणुमंतखेडे आदी भागातही जोरदार पाऊस झाला. या भागातही कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. पिंप्री खुर्द, उंबरखेड, देवळी, दशेगाव, चिंचखेडे (ता. चाळीसगाव) या पूर्वहंगामी कपाशीला फटका बसला आहे. तर कोरडवाहू कपाशीला लाभ झाला आहे. परंतु, कोरडवाहू कपाशीत पातेगळ मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे. 
 
टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...