agriculture news in marathi, crop damage due to rain, pune, maharashtra | Agrowon

गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. १६) सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. वीज अंगावर पडल्याने जुन्नर आणि खेड तालुक्यांतील दोघांचा मृत्यू झाला आहे.  

पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. १६) सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. वीज अंगावर पडल्याने जुन्नर आणि खेड तालुक्यांतील दोघांचा मृत्यू झाला आहे.  

जुन्नर तालुक्यातील येडगाव- भोरवाडी येथील गोठ्यावर वीज पडून शेतकरी महेश दत्तात्रेय भोर यांचा पहाटेच्या वेळी वीज कोसळल्याने मृत्यू झाला. शिरोली बुद्रुक परिसरातील गावांना सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. कांदे काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली होती. ओतूर आणि परिसरातील गावामध्ये वादळी पावसासह गाराही पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नारायणगाव परिसरात मंगळवारी दिवसभरात टप्प्याटप्प्याने वादळी पाऊस झाला. वीटभट्टी व्यावसायिक, कांदा, आंबा व टोमॅटो पिकांना पावसाचा फटका बसला आहे. पेमदरा वादळी पावसासह गारपीट झाल्याने अनेक कौलारू घरांची कौले फुटली. तसेच फळबागांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. 

चिंचोशी (ता. खेड) येथे हरिदास गोकुळे या शेतकऱ्याचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. गोकुळे यांच्या पत्नी व अन्य एक महिला यात जखमी झाल्या. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) परिसरात गारपिटीसह झालेल्या पावसाने पिके व फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कलिंगड, चिकू, केळी, गहू, कडवळ, डाळिंब आदी पिकांना फटका बसला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...