उमरगा तालुक्‍यात पीक बहरले, तलाव भरले

उस्मानाबाद जिल्ह्यात पीक बहरले, तलाव भरले
उस्मानाबाद जिल्ह्यात पीक बहरले, तलाव भरले

उमरगा, जि. उस्मानाबाद ः तालुक्‍यात झालेल्या दमदार पावसामुळे पीक बहरले असून, अतिवृष्टीमुळे ३२ तलावांपैकी सहा तलावांच्या सांडव्यावापर्यंत पाणीसाठा झाला आहे. तर पाच तलावांत ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक साठा उपलब्ध आहे. दरम्यान, सहा वर्षांच्या काळात यंदा २० जुलैपर्यंत सर्वाधिक ४६४.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्‍यातील शेती व्यवसायाचे गणित खरीप पिकांच्या उत्पन्नावर अवलंबून असते. त्यासाठी जून महिन्यात पावसाची नियमितता महत्वाची ठरते. यंदा पहिल्या दीड महिन्यात एकूण सरासरीच्या निम्म्यापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांच्या ठिकाणीही पाणीसाठा वाढला आहे. तालुक्‍यातील ३२ प्रकल्पांपैकी सहा प्रकल्प तुडुंब भरले आहेत. तर पाच प्रकल्पांत ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. सात प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांवर तर १० प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

तीन प्रकल्पांत मृत साठा तर एक प्रकल्प अद्यापही कोरडाच आहे. अन्य तलावांतील पाणीसाठा पुढीलप्रमाणे : तुरोरी मध्यम (७४.३७), मुरळी (५४ .६४), कदेर (७२.५), वागदरी (५७.५), दाळिंब (५२.३४), नारंगवाडी (५२.३५), बेनीतुरा मध्यम प्रकल्पात (२८.२२), कोळसूर (४८.३), गुंजोटी (४९.५८), तलमोडवाडी (३६.१२), कसगी (३९ .५४), एकुरगा (४५.१३), गुंजोटीवाडी (३९.५०), कसमलवाडी (९.७९), कुन्हाळी (१२.४६) व काळलिंबाला लघुप्रकल्पात (१२.३०) टक्के तर पेठसांगवी प्रकल्पात मृत साठा आहे. डिग्गी (२०.५५), केसरजवळगा एक (१.०२ ), केसरजवळगा (०.२६), सरोडी (१९.२८), बलसूर तलाव क्र. एक (३.८२), बलसूर तलाव क्र. दोन (६.४९), कोराळ (४.५७) टक्के इतका तलावात उपयुक्त पाणीसाठा आहे. सुपतगाव व रामनगर या दोन साठवण तलावांत मृत पाणीसाठा आहे. आलूर साठवण तलाव अद्यापही कोरडा आहे. दरम्यान, अजून पावसाळ्याचे दोन ते सव्वा दोन महिने शिल्लक असून, सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पावसाची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com