agriculture news in marathi, crop harvest experiment, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक कापणी प्रयोग
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 मार्च 2018
पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची नुकसानभरपाई निश्‍चित करण्यासाठी शासन दरवर्षीप्रमाणे यंदाही पीक कापणी प्रयोगावर भर देत आहे. चालूवर्षी जिल्ह्यातील महसूल मंडळात रब्बी हंगामातील सर्व पिकांचे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत दोन हजार ९६ पीक कापणी प्रयोग घेण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
 
पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची नुकसानभरपाई निश्‍चित करण्यासाठी शासन दरवर्षीप्रमाणे यंदाही पीक कापणी प्रयोगावर भर देत आहे. चालूवर्षी जिल्ह्यातील महसूल मंडळात रब्बी हंगामातील सर्व पिकांचे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत दोन हजार ९६ पीक कापणी प्रयोग घेण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
 
पिकांच्या हेक्‍टरी सरासरी उत्पादनाचे जिल्हा व राज्य पातळीवर विश्वासार्ह अंदाज काढणे, नुकसानभरपाई निश्‍चित करण्यासाठी तीन ते पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पिकांची पैसेवारी निश्‍चित करण्यासाठी तालुका पातळीवर दहा वर्षांची पिकांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पीकविमा योजनेसाठी मंडळस्तरावरील चालू वर्षी मिळालेल्या पिकांच्या दर हेक्‍टरी उत्पादनाची माहिती पीकविमा कंपनीस कळविण्यासाठी दरवर्षी पीक कापणी प्रयोग घेण्यात येतात.
 
त्यासाठी कृषी विभागातील सर्व स्तरांवरील अधिकारी पिकांच्या उत्पादनाचा रॅंण्डम पद्धतीने अंदाज काढतात. या वेळी महसूल विभागाचे तलाठी, जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक आदी उपस्थित असतात. 
 
पीक कापणी प्रयोगामध्ये जिरायती व बागायती गहू, हरभरा आदी पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू आहे. ज्वारी आणि हरभरा पीक कापणी झाली आहे. सर्व पिकांची माहिती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व नॅशनल इन्शुरन्स कंपनीला लवकरच सादर केली जाणार आहे. तसेच जिल्हा अधीक्षक कार्यालयाने हरभरा पिकाची माहिती १५ मेपर्यंत तर गहू पिकाची माहिती ३१ मेपर्यंत कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविणे गरजेचे आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...