agriculture news in marathi, crop insurance | Agrowon

खरीप पीकविमा अर्जांमध्ये त्रुटी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत 2017 च्या खरीप हंगामामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने विमा कंपनीकडे पाठविलेले 16 हजार 177 अर्ज त्रुटीमुळे विमा कंपनीने नाकारले होते. त्यापैकी 2 हजार अर्जांतील त्रुटी दुरुस्त करण्याचे काम अद्याप बाकी आहे. त्रुटींची तत्काळ पूर्तता करून परिपूर्ण अर्ज विमा कंपनीकडे पाठविणे आवश्‍यक आहे, अन्यथा अनेक तालुक्‍यांतील शेतकरी विमा नुकसानभरपाई परतावा मिळण्यापासून वंचित राहू शकतात.

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत 2017 च्या खरीप हंगामामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने विमा कंपनीकडे पाठविलेले 16 हजार 177 अर्ज त्रुटीमुळे विमा कंपनीने नाकारले होते. त्यापैकी 2 हजार अर्जांतील त्रुटी दुरुस्त करण्याचे काम अद्याप बाकी आहे. त्रुटींची तत्काळ पूर्तता करून परिपूर्ण अर्ज विमा कंपनीकडे पाठविणे आवश्‍यक आहे, अन्यथा अनेक तालुक्‍यांतील शेतकरी विमा नुकसानभरपाई परतावा मिळण्यापासून वंचित राहू शकतात.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत 2017 च्या खरीप हंगामामध्ये ऑनलाइन विमा प्रस्ताव सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते. गावागावांतील जनसुविधा केंद्र, विविध बॅंका, वैयक्तिकरीत्या असे विविध प्रकारे विमा प्रस्ताव सादर करण्यात आले. अर्ज सादरकरण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीच्या घोळात अखेरच्या दिवशी ऑफलाइन अर्जदेखील स्वीकारण्यात आले. जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनीमार्फत खरीप पीकविमा योजना राबविली जात आहे. यंदा जिल्ह्यातील 4 लाख 20 हजार 975 हेक्‍टरवरील मूग, उडीद, तूर, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल, भात या नऊ पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी एकूण 6 लाख 89 हजार 259 अर्ज विमा कंपनीकडे सादर केले असून, त्यासाठी 31 कोटी 81 लाख रुपये विमा हप्त्याचा भरणा केला आहे. त्याबाबतची माहिती विमा कंपनीने कृषी विभाकडे सादर केलेली आहे.

परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून संबंधित शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन अपलोड करत असताना विमा संरक्षित क्षेत्र, पिकांची माहिती अपूर्ण असलेले अर्ज विमा कंपनीकडे पाठविण्यात आले. त्यामुळे डाटामध्ये तफावत येत असल्याचे छाननीदरम्यान आढळून आले. त्यामुळे विमा कंपनीने त्रुटी असलेले 16 हजार 177 विमा अर्ज नाकारत विमा हप्ता बॅंकेला परत करणार असल्याबाबत कृषी विभाग, तसेच राज्यस्तरीय बॅंक समिती (एसएलबीसी) पत्राद्वारे कळविले होते. याचा फटाक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना बसू नये यासाठी विमा कंपनी आणि जिल्हा बॅंकेच्या अधिकारी यांच्यातील चर्चेनंतर बॅंकेने त्रुटी दुरुस्तीचे काम सुरू केले. परंतु अद्याप सुमारे 2 हजार विमा अर्जांतील त्रुटी दुरुस्तीचे काम बाकी राहिले आहे, असे विमा कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

बॅंकेने परिपूर्ण विमा अर्ज तत्काळ विमा कंपनीकडे सादर करावेत, अन्यथा विमा संरक्षण घेतलेले जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांतील शेतकरी विमा परताव्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. यंदा अवेळी आलेल्या पावसामुळे खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी आदी पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. या परिस्थितीत पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु त्रुटीमुळे अर्ज नाकारल्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...