Agriculture News in Marathi, crop insurance for kharif | Agrowon

परभणीतील सव्वाचार लाख हेक्‍टरवरील पिकांना विमा कवच
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 डिसेंबर 2017

परभणी ः परभणी जिल्ह्यात 2017-18 च्या खरीप हंगामात 5 लाख 21 हजार 782 हेक्‍टरवर पेरणी झालेली असताना, शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत 4 लाख 20 हजार 975 हेक्‍टरवरील मूग, उडीद, तूर, कापूस, सोयाबीन, सूर्यफूल, ज्वारी, बाजरी, भात या 9 पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

यंदा कर्जदार शेतकऱ्यांनी 46 हजार 984 आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 6 लाख 42 हजार 275 असे दोन्ही मिळून एकूण 6 लाख 89 हजार 259 विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. शेतकऱ्यांनी एकूण 31 कोटी 81 हजार 413 रुपये विमा हप्त्याचा भरणा केला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी ः परभणी जिल्ह्यात 2017-18 च्या खरीप हंगामात 5 लाख 21 हजार 782 हेक्‍टरवर पेरणी झालेली असताना, शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत 4 लाख 20 हजार 975 हेक्‍टरवरील मूग, उडीद, तूर, कापूस, सोयाबीन, सूर्यफूल, ज्वारी, बाजरी, भात या 9 पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

यंदा कर्जदार शेतकऱ्यांनी 46 हजार 984 आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 6 लाख 42 हजार 275 असे दोन्ही मिळून एकूण 6 लाख 89 हजार 259 विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. शेतकऱ्यांनी एकूण 31 कोटी 81 हजार 413 रुपये विमा हप्त्याचा भरणा केला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा खरीप पिकांचे विमा प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने भरणे अनिवार्य करण्यात आले होते. जनसुविधा केंद्र, बॅंका तसेच पीकविमा पोर्टलवर वैयक्तिकरीत्या असे विविध पद्धतीने शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव दाखल केले.

कर्जदार शेतकऱ्यांचे 46 हजार 984 प्रस्ताव
विविध बॅंकांकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण घेणे बंधनकारक असताना यंदा जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी 46 हजार 984 विमा प्रस्ताव बॅंकांकडे दाखल केले आहेत. यामध्ये मूग पिकासाठीचे 8 हजार 804 प्रस्ताव, उडिदाचे 4 हजार 232 प्रस्ताव, कपाशीचे 6 हजार 47 प्रस्ताव, सोयाबीनचे 20 हजार 764 प्रस्ताव, ज्वारीचे 733, बाजरीचे 296, भाताचे 11, तुरीचे 5 हजार 990, सूर्यफुलाच्या 107 प्रस्तावांचा समावेश आहे.

बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे 6 लाख 42 हजार 275 प्रस्ताव
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना जनसुविधा केंद्र, पीकविमा पोर्टलवरून पीकविमा प्रस्ताव सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी एकूण 6 लाख 42 हजार 275 विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये मुगाचे 1 लाख 48 हजार 171 प्रस्ताव, उडदाचे 66 हजार 72, कपाशीचे 49 हजार 988, सोयाबीनचे 2 लाख 53 हजार 820, तुरीचे 96 हजार 70, ज्वारीचे 19 हजार 875, बाजरीचे 5 हजार 401, भाताचे 481, सूर्यफुलाचे 2 हजार 397 प्रस्तावांचा समावेश आहे.

चार लाख हेक्‍टरवरील पिकांना विमा कवच
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 5 लाख 21 हजार 782 हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली. परंतु शेतकऱ्यांनी 4 लाख 20 हजार 975 हेक्‍टरवरील पिकांसाठीच विमा कवच घेतले. यदा कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे मिळून एकूण 6 लाख 89 हजार 259 विमा प्रस्ताव दाखल केले आहेत.

75 हजार 61 हेक्‍टरवरील मूग पिकांसाठी 1 लाख 56 हजार 975 प्रस्ताव, 28 हजार 319.48 हेक्‍टरवरील उडदासाठी 70 हजार 304, 26 हजार 302.43 हेक्‍टरवरील कपाशीसाठी 56 हजार 35 प्रस्ताव, 2 लाख 36 हजार 379.56 हेक्‍टरवरील सोयाबीनसाठी 2 लाख 53 हजार 820 प्रस्ताव, 42 हजार 782.48 हेक्‍टरवरील तुरीसाठी 1 लाख 2 हजार 60 प्रस्ताव, 8 हजार 433.86 हेक्‍टरवरील ज्वारीसाठी 20 हजार 608 प्रस्ताव, 2 हजार 648.93 हेक्‍टरवरील बाजरीसाठी 5 हजार 697 प्रस्ताव, 146.62 हेक्‍टरवरील भात पिकासाठी 492 प्रस्ताव, 900.45 हेक्‍टरवरील सूर्यफुलासाठी 2 हजार 504 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

एकूण 1 हजार 393 कोटी 23 लाख 32 हजार 941 रुपयांचे विमा संरक्षण घेतले असून, त्यासाठी शेतकऱ्यांनी 31 कोटी 81 हजार 413 रुपये विमा हप्ता भरला आहे. दरम्यान, 2016 च्या खरिपात 1 लाख 85 हजार 645 कर्जदार आणि 4 लाख 61 हजार 861 बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी एकूण 6 लाख 47 हजार 514 विमा प्रस्ताव सादर केले होते. 36 कोटी 38 लाख 97 हजार रुपये विमा हप्ता भरून 4 लाख 24 हजार 85 हेक्‍टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते.

शेतकऱ्यांना पीकविम्याच्या परताव्याची प्रतीक्षा
यंदा पेरणीनंतर आलेला पावसाचा दीर्घ खंडामुळे सर्वच खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. काढणीच्या अवस्थेत परतीच्या पावसामुळे दाण्याची प्रत खराब झाली. मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांच्या कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून गतवर्षीच्या तुलनेत सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे.

कपाशीवरील बोंड अळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई मिळणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना विमा परतावा वेळेवर देण्यासाठी राज्य शासनाने आपल्या हिश्‍शाचे अनुदान विमा कंपन्याना वितरित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यतील शेतकरी विमा परताव्याच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...