मराठवाड्यात विमा प्रस्ताव सर्वाधिक ६३ लाखावर

विमा प्रस्ताव पोचले ६३ लाख ३७ हजारांवर
विमा प्रस्ताव पोचले ६३ लाख ३७ हजारांवर

औरंगाबाद :  प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरिपाच्या विविध पिकांचा विमा उतरविण्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी घेतलेली आघाडी कायम आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून ६३ लाख ३७ हजार ६६ पीकविमा प्रस्ताव १ ऑगस्टच्या सकाळपर्यंत दाखल झाले होते. बॅंकांना स्वीकारलेला विमा प्रस्ताव दाखल करण्याची असलेली मुदत पाहता या आकड्यांमध्ये बदल होणार हे स्पष्ट आहे.

राज्यातील कृषी विभागाच्या आठ विभागांतून ७९ लाख ९९ हजार ६०१ विमा प्रस्ताव १ ऑगस्टच्या सकाळपर्यंत दाखल करण्यात आले आहेत. कोकण विभागातून ३६ हजार ९१६, नाशिक विभागातून ३८ हजार ७८६, पुणे विभागातून ५ लाख ७१ हजार ५१३, कोल्हापूर विभागातून २२ हजार ७७९, औरंगाबाद विभागातून ३० लाख ६४ हजार ६०९, लातूर विभागातून ३२ लाख ७३ हजार ५७, अमरावती विभागातून ९ लाख ३० हजार ६६ तर नागपूर विभागातून ६१ हजार ८७५ विमा प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

राज्यात सर्वाधिक पीकविमा प्रस्ताव दाखल झालेल्या मरठवाड्यातील औरंगाबाद कृषी विभागात ३० लाख ६४ हजार ६०९, तर लातूर कृषी विभागातून ३२ लाख ७३ हजार ५७ विमा प्रस्तावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय दाखल खरीप पीकविमा प्रस्ताव
औरंगाबाद ६ लाख ३६ हजार ८३०
जालना ९ लाख ३६ हजार ६०५
बीड १४ लाख ९१ हजार १७४
लातूर १ लाख १२ हजार १७४
उस्मानाबाद ११ लाख १३ हजार ९४४
नांदेड ११ लाख ९१ हजार ४६६
परभणी ५ लाख ९२ हजार ७०
हिंगोली २ लाख ६३ हजार ४०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com