agriculture news in marathi, crop insurance refund | Agrowon

पीकविमा परतावाप्रश्नी जिल्हा बंदला प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 जुलै 2018

परभणी ः पीक विमा परतावा प्रश्नी गुरुवारी (ता. ५) विविध पक्षांनी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यातील विविध तालुक्यांत संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणी येथील नवा मोंढा बाजारपेठेसह अन्य ठिकाणचे व्यवहार ठप्प होते. शुक्रवारी (ता. ६) सकाळी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात १९ ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

परभणी ः पीक विमा परतावा प्रश्नी गुरुवारी (ता. ५) विविध पक्षांनी पुकारलेल्या बंदला जिल्ह्यातील विविध तालुक्यांत संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणी येथील नवा मोंढा बाजारपेठेसह अन्य ठिकाणचे व्यवहार ठप्प होते. शुक्रवारी (ता. ६) सकाळी जिल्ह्यातील नऊ तालुक्यात १९ ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पीक विमा परतावा नाकारणाऱ्या विमा कंपनीच्या विरोधात कारवाई करून शेतकऱ्यांना विमा परतावा देण्यात यावा. या मागणीसाठी शेतकरी विमा संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या उपोषणाला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. बुधवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयातील ठिय्या आंदोलनानंतर गुरुवारी (ता. ५) शिवसेनचे खासदार संजय जाधव, माजी कृषिराज्यमंत्री तथा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, भाकपचे राजन क्षीरसागर, माकपचे विलास बाबर, श्रीनिवास जोगदंड यांनी जिल्हा बंदचे आवाहन केले होते. त्यास समिश्र प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी सकाळी परभणी तालुक्यात चार ठिकाणी, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड तालुक्यांत प्रत्येकी दोन ठिकाणी सेलू, पालम तालुक्यात प्रत्येकी एका ठिकाणी असे १९ ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...