agriculture news in marathi, crop insurance will be given through DBT says minister Pandurang Fhundker | Agrowon

पीकविम्याच्या नुकसानभरपाईची रक्कम डीबीटीद्वारे : पांडुरंग फुंडकर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई : शेतकऱ्यांना पीकविम्याच्या नुकसानभरपाईची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी ती थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशा सूचना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिल्या.

मुंबई : शेतकऱ्यांना पीकविम्याच्या नुकसानभरपाईची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी ती थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशा सूचना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिल्या.

पंतप्रधान पीकविमा योजनेबाबतच्या कार्यवाहीचा आढावा श्री. फुंडकर यांनी घेतला. या वेळी अपर मुख्य सचिव विजय कुमार, सहसचिव आर. बी. घाडगे, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खरीप हंगाम २०१७ मधील पीकविमा नुकसानभरपाईबाबत कारवाईचा आढावा घेताना कृषिमंत्री श्री. फुंडकर म्हणाले, की विमा कंपन्यांनी बँक स्तरावरील शेतकऱ्यांच्या याद्यांची पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन या याद्या विमा कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध कराव्यात. नुकसानभरपाईस पात्र असलेला एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नुकसानभरपाईबाबतच्या प्रक्रियेला गती द्यावी.

रब्बी २०१६ हंगामातील २७ कोटी ५६ लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली असून, संबंधित कंपनीने विमा योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी व शेतकरीनिहाय नुकसानभरपाईचा तपशील असलेली माहिती पीकविमा पोर्टल आणि विमा कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, तसेच कृषी विभागालाही नुकसानभरपाईच्या रकमेसह याद्या उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना मंत्री फुंडकर यांनी केल्या.

पीकविमा नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे जमा करण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर गोंदिया जिल्ह्यात सुरू करण्यात आली. दोन कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील ११ महसूल मंडळांमध्ये डीबीटीद्वारे नुकसानभरपाई जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, ते तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले. या वेळी खरीप २०१८ च्या अनुषंगाने पीकविमा नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...