agriculture news in marathi, crop loan affected farmers criticizes government | Agrowon

शेत विकण्याची आलीय वेळ !
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

मनमाड, जि. नाशिक : पाऊस पडला, शेत पेरायचं, खिशात दमडी नाही, बीभरण कुठून आणायचं, सोसायटीतून कर्ज मिळेना. शेवटी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ शासनानं आणली असून, कर्जमाफीचं केवळ गाजर दाखवलंय. प्रत्यक्षात काहीच नसल्यानं शेत विकण्याची वेळ ओढवल्याची कैफियत वंजारवाडीच्या चिंतातुर शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. ३०) मांडली.

मनमाड, जि. नाशिक : पाऊस पडला, शेत पेरायचं, खिशात दमडी नाही, बीभरण कुठून आणायचं, सोसायटीतून कर्ज मिळेना. शेवटी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ शासनानं आणली असून, कर्जमाफीचं केवळ गाजर दाखवलंय. प्रत्यक्षात काहीच नसल्यानं शेत विकण्याची वेळ ओढवल्याची कैफियत वंजारवाडीच्या चिंतातुर शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. ३०) मांडली.

शासनाने कर्जमाफी केल्याने पुन्हा कर्ज मिळेल असे वाटले होते. पण तसे न झाल्याने आमच्या भागात पाऊस होऊन शेतीची कामे सुरू झाली. पण खिशात दमडी नसल्याने बीभरण, खत आणायचे कुठून? शेत तयार करायला पैसे नाहीत, दुकानदार उधार द्यायला तयार नाही, तर परिसरातील सात गावांच्या वर गावे मनमाड विविध कार्यकारी सहकारी संस्थेशी संलग्न आहेत. मात्र सोसायट्यांना पतपुरवठा करणाऱ्या जिल्हा बॅंकेला शासनाने कर्ज न दिल्याने सोसायट्या शेतकऱ्यांना कुठून कर्ज देतील. जालिंदर जाधव या शेतकऱ्याने दोन लाख कर्ज काढले होते. व्याज-मुद्दल धरून तीन लाख ऐंशी हजार झाले. शासनाची दीड लाख कर्जमाफी मिळाली. जवळ पैसे नसताना सावकार,

व्यापाऱ्यांकडून व्याजाने पैसे काढत उरलेले एक लाख ऐंशी हजार भरले. मात्र कर्ज नसल्याचा दाखला देण्याचा जीआरच नसल्याचे सोसायटीकडून सांगण्यात आले. यामुळे ७/१२ उताऱ्यावरील बोजा कमी झाला नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकेतून कर्ज काढता येईना, सोसायट्या कर्ज द्यायला तयार नाहीत. आता करायचे काय, असा प्रश्‍न जाधव यांनी या वेळी विचारला.

सावकाराकडून व्याजाने पैसे काढून कर्जमाफी नसलेली रक्कम भरली. पेरणीचा हंगाम सुरू आहे पण सोसायट्या कर्ज द्यायला तयार नाहीत. शेत विकण्याची वेळ शासनाने आणली आहे.
- संजय जाधव, शेतकरी, वंजारवाडी

शासनाने कर्जमाफी झाली म्हणून सांगितले; पण उताऱ्यावरचा बोजाही कमी झाला नाही. मागच्या वर्षी उत्पादन न झाल्याने यंदा जवळ पैसे नाहीत. त्यामुळे सावकाराकडून पैसे घेऊन बीभरण केले.
- दशरथ जाधव, शेतकरी, वंजारवाडी

शेतकरी आमच्याकडे रोज चकरा मारून कर्जाची विचारपूस करतात. मात्र जिल्हा बॅंकेलाच पतपुरवठा नसल्याने हतबलता निर्माण झाली  आहे.
- सुरेश आहिरे, अध्यक्ष, मनमाड कार्यकारी सहकारी संस्था

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...