वऱ्हाडात पीककर्ज वाटपाचा गाडा फसलेलाच

पीककर्ज
पीककर्ज

अकोला  ः कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ९) अमरावती विभागाची खरीप अाढावा बैठक अकोला येथे होत अाहे. या बैठकीत पीककर्ज वाटपाचा मुद्दा प्रामुख्याने गाजण्याची चिन्हे अाहेत. वऱ्हाडातील अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांमध्ये पीककर्ज वाटपात सर्वत्र सावळा गोंधळ सुरू असून बँकांकडून अडवणुकीचे प्रकार सर्रास होत अाहेत. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार अाढावा बैठका घेऊन कर्जवाटपाला गती देण्याचे निर्देश दिले जात असताना त्याचा काहीही परिणाम झालेला दिसून अालेला नाही.

वऱ्हाडात तीन जिल्हे मिळून खरिपासाठी ४५५४ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असताना अातापर्यंत ३२८ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती समोर अाली अाहे. बुलडाणा जिल्ह्यात १७४५ कोटींचा पीककर्जवाटप लक्ष्यांक अाहे. या जिल्ह्यात अातापर्यंत अवघे ६५ कोटी म्हणजे ३.७३ टक्के पीककर्ज वाटप झाले अाहे. एक लाख ७४ हजार ५६१ खातेदार शेतकऱ्यांपैकी सहा हजार ७३८ शेतकऱ्यांना ६५ कोटी १० लाख रुपये वाटप झाले अाहेत. एक लाख ६८ हजार ८०० शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्ज मिळालेले नाही. जिल्ह्यातील एकूण पीककर्ज वाटपाच्या १७४५ कोटींच्या लक्ष्यांकापैकी सर्वाधिक १२२४ कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना उद्दिष्ट देण्यात अालेले अाहे. परंतु या बँकांनी अाजवर अवघे ३८ कोटी ८६ लाख रुपयेच वाटप केले.

वाशीम जिल्ह्यात खरिपासाठी १४७५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात अाले. अातापर्यंत या जिल्ह्यात १०६ कोटींचे वाटप झाले. यात अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक १०, ७४२ सभासदांना ९४ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले. उर्वरित बँकांनी मिळून १२ कोटी २५ लाख रुपये २१८० सभासदांना दिले. या जिल्ह्यात अातापर्यंत १७ टक्के पीककर्ज वाटप झाले.

अकोला जिल्ह्यात खरिपात १३३४ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना देण्यात अाले. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेस ६८३ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना ५२७, खासगी बँकांना ४७ अाणि ग्रामीण बँकेला ७५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप उद्दिष्ट अाहे. जिल्ह्यात अातापर्यंत १५७ कोटींचे म्हणजेच उद्दिष्टाच्या केवळ १२ टक्के पीककर्ज वितरीत झाले. यात जिल्हा बँकेचा सर्वाधिक १२२ कोटी रुपयांचा वाटा अाहे. उर्वरित इतर बँकांनी मिळून केवळ ३५ कोटी रुपये वाटप केले.

जूनचा पहिला अाठवडा संपला. अाता पेरण्या लवकरच सुरु होण्याची शक्यता अाहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पैशांची गरज असताना बँकांकडून कर्ज वाटपाला गती अालेली नाही.  

पीक कर्जवाटपाची स्थिती (कोटी रुपये)
जिल्हा लक्ष्यांक वाटप  टक्के
अकोला १३३४ १५७ १२
बुलडाणा १७४५ ६५.१० ३.७३
वाशीम १४७५ १०६   १७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com