agriculture news in marathi, crop loan distribution issue, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमधील अनेक भागांत राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीककर्ज वितरण बंद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

जळगाव  ः जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पीककर्ज वितरणाची गती वाढविली आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिशीनंतरही पीककर्ज वितरणाची गती संथच ठेवली आहे. कहर म्हणजे अनेक भागात राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये सध्या पीककर्ज वितरण बंद केले आहे.

जळगाव  ः जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पीककर्ज वितरणाची गती वाढविली आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिशीनंतरही पीककर्ज वितरणाची गती संथच ठेवली आहे. कहर म्हणजे अनेक भागात राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये सध्या पीककर्ज वितरण बंद केले आहे.

जे नवे प्रस्ताव पीक कर्जासाठी ग्रामीण भागातील राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये येत आहे. ते सपशेल नाकारून जिल्हास्तरावर कृषी विकास शाखेत जा, बॅंकेतील कृषी अधिकाऱ्यांना भेटा, अशी उत्तरे बॅंकेचे व्यवस्थापक देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे. मागील आठवड्यात आठ टक्के पीक कर्जवाटप राष्ट्रीयीकृत बॅंकांनी केले होते. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी बॅंकांना नोटीस बजावली होती. यानंतरही कर्ज वितरण गतीने सुरू नाही.

नव्या आठवडा अर्धा संपत आला तरी पीक कर्ज वितरण फक्त १५ टक्‍क्‍यांपर्यंत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी गाठले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ५५५ कोटी रुपये कर्जवाटप झाले असून, हे प्रमाण निश्‍चित पीककर्ज वितरण उद्दिष्टाच्या सुमारे २२ टक्के आहे. सर्वाधिक पीककर्ज वितरण जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने केले आहे. या बॅंकेने सुमारे ४४ हजार सभासदांना पीककर्ज वितरण केले आहे. नेमके किती कर्ज जिल्हा बॅंकेने दिले, याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळू शकली नाही.

परंतु जिल्हा बॅंकेने एकूण उद्दीष्टाच्या ३९ टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज वितरण केले आहे. जिल्हा बॅंक पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करेल, असे सांगण्यात आले. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सुमारे १२ हजार शेतकरी सभासदांना सुमारे १३८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या सुमारे १५ टक्केच असल्याची माहिती मिळाली.

भडगाव, पाचोरा, जळगाव, चोपडा, यावल, चाळीसगाव, अमळनेर भागातील राष्ट्रीयीकृत बॅंकांना सभासदांना पीककर्ज वितरणासंबंधी आडकाठी करीत आहेत. सर्च रिपोर्ट व इतर कागदपत्रांची मागणी करीत आहेत. यंदा कागदपत्रांसाठी अधिकची वणवण शेतकऱ्यांना करावी लागत असल्याचे सांगण्यात आले. यातच अनेक शाखांमध्ये पीककर्ज वितरण बंद केले आहे. त्यामुळेदेखील पीककर्ज वितरणाची टक्केवारी फारशी वाढलेली नसल्याचे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...