agriculture news in marathi, crop loan distribution process become slow, akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात पीककर्ज वाटपाला गती मिळेना
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018
अकोला  ः खरीप हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना पीककर्ज वाटपाने अद्यापही गती घेतलेली नाही. जिल्ह्यात अातापर्यंत केवळ २१४ कोटींचे कर्जवाटप झाले असून, जिल्हा बँकेने यात अाघाडी घेतलेली दिसून येते. 
 
अकोला  ः खरीप हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना पीककर्ज वाटपाने अद्यापही गती घेतलेली नाही. जिल्ह्यात अातापर्यंत केवळ २१४ कोटींचे कर्जवाटप झाले असून, जिल्हा बँकेने यात अाघाडी घेतलेली दिसून येते. 
 
अकोला जिल्ह्यात १३३७ कोटींचे पीककर्ज वाटप केले जाणार अाहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६८३ अाणि सर्व राष्ट्रीयीकृत बँका मिळून ६८६ कोटींचे पीककर्ज वाटप करण्याचा लक्ष्यांक देण्यात अाला अाहे. अातापर्यंत या दोन्ही बॅंकांनी मिळून २१४ कोटींचे कर्जवाटप केले अाहे. जून महिना अवघा १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना २५ टक्केसुद्धा पीककर्ज वाटप झालेले नाही.
 
जिल्हा बँकेने १०६ अाणि राष्ट्रीयीकृत बँकांनी १०८ कोटींचे पीककर्ज वाटप केले. जिल्ह्यातील २२ हजार ९८५ शेतकऱ्यांना २१४ कोटींचे पीककर्ज वाटप झाले अाहे. 
जिल्ह्यातील शेतकरी सध्या मशागतीच्या कामांमध्ये गुंतले अाहेत.
 
शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया राबवली जात असल्याने बँकाकडून (विशेषतः राष्ट्रीयीकृत) नवीन कर्जवाटप करण्यास सध्या तितकीशी उत्सुकता दाखवली जात नाही. शेतकरी बँकांमध्ये जाऊन कर्जमाफी झाली काय, नवीन कर्ज कधी मिळेल याची विचारणा करताना दिसतात.
 
बँकांनी कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध कराव्यात असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले अाहेत. परंतु याद्या अद्याप अपूर्ण असल्याने प्रसिद्ध झालेल्या नाहीत. जिल्हा बँकेने कर्जमाफी मिळालेल्यांना मेसेज पाठविल्याने या बँकेच्या कर्जमुक्त झालेल्या खातेदारांना दिलासा मिळाला. इतर बँकांनी मात्र तसे काही केलेले नाही.
 
परिणामी शेतकरी अद्यापही संभ्रमात अाहेत. नवीन हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची गरज अाहे. सध्या हजारो शेतकऱ्यांची तूर अाणि हरभरा घरातच पडून अाहे. विक्री केलेल्या तूर, हरभऱ्याचे चुकारेसुद्धा रखडलेले असल्याने पैशांची तजवीज करताना अडचणी अाहेत. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...