agriculture news in marathi, crop loan distribution status, akola, maharashtra | Agrowon

पीककर्ज मिळत नसल्याने अकोला जिल्ह्यात उसनवारीचे व्यवहार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

अकोला  : खरिपातील पेरण्या सुरू झाल्या असून बाजारपेठेत बियाणे, खते खरेदीची लगबग वाढलेली अाहे. मात्र हजारो शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज वाटप झालेले नसल्याने उधारी, हात उसनवारीचे व्यवहार सर्वत्र वाढले अाहेत. शेतकरी बँकांमध्ये सातत्याने चकरा मारत असून पीककर्जासाठी अर्ज दिल्यानंतर बँकांकडून पुढील १० ते १५ दिवसानंतरची मुदत दिली जात अाहे. यामुळे पीककर्ज वाटप कधी होईल, असा प्रश्न सध्या निर्माण झाला अाहे. अकोला जिल्ह्यात सर्व बँकांनी मिळून सोमवार (ता.२५) पर्यंत केवळ १५ टक्के पीककर्ज वाटप केले अाहे.

अकोला  : खरिपातील पेरण्या सुरू झाल्या असून बाजारपेठेत बियाणे, खते खरेदीची लगबग वाढलेली अाहे. मात्र हजारो शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज वाटप झालेले नसल्याने उधारी, हात उसनवारीचे व्यवहार सर्वत्र वाढले अाहेत. शेतकरी बँकांमध्ये सातत्याने चकरा मारत असून पीककर्जासाठी अर्ज दिल्यानंतर बँकांकडून पुढील १० ते १५ दिवसानंतरची मुदत दिली जात अाहे. यामुळे पीककर्ज वाटप कधी होईल, असा प्रश्न सध्या निर्माण झाला अाहे. अकोला जिल्ह्यात सर्व बँकांनी मिळून सोमवार (ता.२५) पर्यंत केवळ १५ टक्के पीककर्ज वाटप केले अाहे.

जिल्ह्यात पीककर्ज वाटपाला एप्रिलपासून सुरवात झाली अाहे. यावर्षी १३३४ कोटी रुपये खरिपात पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक ठेवण्यात अाला. मात्र आजवर बँकांनी एक लाख ४० हजार ५११ खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ २४ हजार ६६२ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले. ही रक्कम अवघी २१३ कोटी एवढी आहे.

या आठवड्यात पावसाचे सर्वत्र पुनरागमन झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली. पेरणी करण्यासाठी लागणारे बियाणे, खते खरेदीसाठी शेतकरी बाजारात जात असताना त्याच्याकडे पैशांची चणचण आहे. जिल्ह्यात पात्र खातेदार शेतकऱ्यांपैकी सुमारे एक लाख १५ हजार शेतकरी पीककर्जापासून वंचित अाहेत. 

पीककर्ज वाटप अधिक गतीने करा अशा प्रकारच्या सूचना मंत्री, अधिकारी वारंवार देत अाहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तर कॅनरा, ॲक्सिस बँकेतील शासकीय खात्यांचे व्यवहार थांबवले आहेत. येत्या अाठ दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास त्यांनी सर्वच बँकांना कारवाईचा इशारा सुद्धा दिला. गेल्या महिनाभरापासून प्रशासन बँकांकडे पाठपुरावा करीत असताना बँका मात्र अापली पारंपरिक चाकोरी सोडायला तयार नाहीत.

जिल्ह्यात जून संपायला अालेला असताना अद्याप २० टक्केसुद्धा पीककर्ज वाटप झालेले नाही. सर्व बँकांनी मिळून १३३४ कोटींच्या लक्ष्यांपैकी अवघे २१३ कोटी रुपये पीककर्ज वाटप केले अाहेत. ही टक्केवारी अवघी १५ एवढी अाहे.  

शेतकऱ्यांबाबत राष्ट्रीयीकृत बँकांची भूमिका फारशी चांगली नसल्याचे दिसून येत अाहे. स्टेट बँक अाॅफ इंडियाला खरीपासाठी २११ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट असताना अातापर्यंत केवळ १२ कोटी वाटप केले. जिल्ह्यात अग्रणी बँकेचा दर्जा असलेल्या सेंट्रल बँकेने ९१ कोटींच्या उद्दिष्टापैकी अवघे १० कोटी वाटप केले आहेत. ही कामगिरी ११ टक्के अाहे. जिल्ह्यात असलेल्या सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी मिळून १० टक्के पीक कर्ज वाटप केले अाहे. या बँकांना ५०१ कोटींचे उद्दीष्ट देण्यात अालेले असून अाजवर ५५ कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज म्हणून दिले अाहेत.    

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...