agriculture news in marathi, crop loan distribution status, dhule, maharashtra | Agrowon

धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून ३६ कोटींचे पीककर्ज वितरण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर पात्र शेतकऱ्यांना सुमारे ८१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले. २०१९-२० या आर्थिक वर्षात धुळे-नंदुरबार जिल्हा बॅंक पीककर्ज वाटपात दोन्ही जिल्ह्यांत आघाडीवर आहे; परंतु राष्ट्रीयीकृत बॅंका मात्र शेतकऱ्यांना पीककर्जासाठी वणवण करायला लावत असल्याची स्थिती आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी फक्त ३६ कोटी रुपये पीककर्ज मागील आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना विविध शाखांच्या माध्यमातून वितरित केल्याची माहिती मिळाली

धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर पात्र शेतकऱ्यांना सुमारे ८१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले. २०१९-२० या आर्थिक वर्षात धुळे-नंदुरबार जिल्हा बॅंक पीककर्ज वाटपात दोन्ही जिल्ह्यांत आघाडीवर आहे; परंतु राष्ट्रीयीकृत बॅंका मात्र शेतकऱ्यांना पीककर्जासाठी वणवण करायला लावत असल्याची स्थिती आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी फक्त ३६ कोटी रुपये पीककर्ज मागील आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना विविध शाखांच्या माध्यमातून वितरित केल्याची माहिती मिळाली

धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व विविध कार्यकारी व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमधील सभासद, बॅंकेमार्फत थेट वैयक्तिक पीक कर्ज घेणारे सभासद व बॅंकेच्या सर्व सभासदांना कर्ज दिले जाते. गेल्या वर्षी बॅंकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने जाहीर केल्याप्रमाणे या वर्षी १० एप्रिलला पीककर्ज वाटपास सुरवात केली. संपूर्ण पीककर्जाचे वाटप रूपे केसीसी कार्डद्वारेच करण्यात आले. जिल्हा बॅंकेची कर्जवाटपाची पद्धत एकदम सोपी व सुटसुटीत आहे. कापूस पिकास एकरी २१ हजारांप्रमाणे कर्जवाटप केले. पीककर्जमर्यादेत वाढ करण्यात आली. त्यानुसार संपूर्ण जिरायती पीक घेणाऱ्या सभासदांची कर्ज मर्यादा एक लाख होती आता ती दीड लाख केली.

बारमाही बागायत पीक घेणाऱ्या सभासदास दीड लाखाऐवजी दोन लाख कर्ज मिळते. जिरायती, बागायत व ऊस अशी पिके घेणाऱ्या सभासदास दोन लाखांऐवजी आता अडीच लाख रुपये कर्ज मिळते. जिल्हा बॅंक दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, व्यापारी व खासगी बॅंकेपेक्षा सरस कामगिरी करत आहे. यावर्षीसुद्धा सतत आघाडी घेऊन दुष्काळी व टंचाईसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांच्या हितास प्रथम प्राधान्य देत असल्याचे बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...