agriculture news in marathi, crop loan distribution status, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत दोन टक्के पीक कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बॅंकांकडून शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेर अवघे दोन टक्के पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. स्टेट बँक अॅाफ इंडिया या बॅंकेने सर्वाधिक चार कोटी ६४ लाखांचे म्हणजेच उद्दिष्टाच्या ५ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. उर्वरित पाच महिन्यांत ९८ टक्के रब्बी पीककर्ज वितरणाचे बँकासमोर आव्हान आहे.  

सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बॅंकांकडून शेतकऱ्यांना ऑक्‍टोबरअखेर अवघे दोन टक्के पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. स्टेट बँक अॅाफ इंडिया या बॅंकेने सर्वाधिक चार कोटी ६४ लाखांचे म्हणजेच उद्दिष्टाच्या ५ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. उर्वरित पाच महिन्यांत ९८ टक्के रब्बी पीककर्ज वितरणाचे बँकासमोर आव्हान आहे.  

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ११२० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी ऑक्‍टोबर महिनाअखेर २४ कोटी ९८ लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. रब्बी हंगामात पीककर्ज वितरण राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून केले जात आहे. या बॅंकांसाठी ४३९ कोटी ८० लाखांचे उद्दिष्ट असून, यापैकी १४ कोटी तीन लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी तीन टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांत स्टेट बँक अॅाफ इंडिया या बॅंकेने सर्वाधिक चार कोटी ६४ लाखांचे म्हणजेच उद्दिष्टाच्या ५ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. यानंतर बँक अॅाफ महाराष्ट्र या बँकेने तीन कोटी ३६ लाखांचे म्हणजेच उद्दिष्टाच्या चार टक्के कर्जाचे वितरण केले. खासगी बॅंकांनी एकूण उद्दिष्टापैकी सहा टक्के कर्जवाटप केले आहे. खासगी बॅंकांत एचडीएफसी या बॅंकेने ३ कोटी ७६ लाख कर्ज वितरण केले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने तीन कोटी ८६ लाख कर्ज वितरण केले आहे. जिल्हा बॅंकेने एकूण उद्दिष्टापैकी एक टक्के कर्जाचे वितरण केले आहे.

रब्बी पीककर्ज वितरण सुरू होऊन एक महिना उलटला असून, कर्ज वितरण करण्याची मार्चअखेरपर्यंत मुदत आहे. यामुळे उर्वरित पाच महिन्यांत सर्व बॅंकाना कर्जाचे उद्दिष्टे पूर्ण करावे लागणार आहे. रब्बी हंगाम हा माण, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या दुष्काळी तालुक्‍यांचा प्रमुख हंगाम असल्याने या तालुक्‍यात रब्बी कर्ज जास्त प्रमाणात वितरण केले जाते. मात्र या तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने कर्जाचे उद्दिष्ट कितपत पूर्ण होते ते पाहावे लागणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...