agriculture news in marathi, crop loan distribution status, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ५० टक्के पीककर्ज वितरण
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

सातारा ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १६८० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १५ जूनपर्यंत ८४२ कोटी ९९ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ५० टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सर्वाधिक ७२४ कोटी २४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.

सातारा ः जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १६८० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १५ जूनपर्यंत ८४२ कोटी ९९ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ५० टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सर्वाधिक ७२४ कोटी २४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.

खरिपासाठी सप्टेंबरपर्यंत कर्जवाटपाची मुदत असून, त्याकरिता साडेतीन महिने बाकी राहिले आहेत. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १६८० कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत दिलेल्या उद्दिष्टाच्या ५० टक्के वाटप झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बॅंकनिहाय हेच आकडे पाहता, कर्जवाटपाची टक्केवारी कमी होते. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे सातारा जिल्हा बॅंकेशी व त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंकेशी जोडलेले आहेत.

पीककर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आघाडीवर असून, या बॅंकेस या हंगामात ८१० कोटींचे पीककर्ज वाटप उद्दिष्ट होते. त्यापैकी या बॅंकेने ७२४ कोटी २४ लाख रुपयांचे वाटप केले असून, ८९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रला १५० कोटी उद्दिष्ट होते. त्यापैकी या बॅंकेने ३० कोटी ६८ लाख रुपयांचे वाटप केले असून, २० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने १५० कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी ३१ कोटी ३५ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टांच्या २१ टक्के कर्जाचे वितरण केले. बॅंक ऑफ इंडियाने १३८ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी १२ कोटी १८ लाख रुपये म्हणजेच ९ टक्के वाटप केले आहे.

जिल्ह्यात पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २१ राष्ट्रीयीकृत बॅंकांनी १५; तर खासगी बॅंकांनी अवघे आठ टक्के कर्ज वितरण केले आहे. रब्बी हंगामाप्रमाणे या खरीप हंगामात पीककर्ज वितरणाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...