agriculture news in marathi, crop loan distribution status, varhad, maharashtra | Agrowon

अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३० टक्क्यांच्या आतच
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यासाठी सरकारने कोट्यवधींची तरतूद केली खरी; मात्र बँकांची नकारात्मक भूमिका, तांत्रिक अडचणींमुळे अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांत अवघे ३० टक्केही पीक कर्जवाटप होऊ शकलेले नाही. खरीप हंगामासाठी पीक कर्जवाटप करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत असलेली मुदत लवकरच पूर्ण होत असून अाता राहिलेल्या पाच दिवसांत ७० टक्के पीककर्ज कसे वाटप करणार हा प्रश्नच अाहे.

अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यासाठी सरकारने कोट्यवधींची तरतूद केली खरी; मात्र बँकांची नकारात्मक भूमिका, तांत्रिक अडचणींमुळे अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांत अवघे ३० टक्केही पीक कर्जवाटप होऊ शकलेले नाही. खरीप हंगामासाठी पीक कर्जवाटप करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत असलेली मुदत लवकरच पूर्ण होत असून अाता राहिलेल्या पाच दिवसांत ७० टक्के पीककर्ज कसे वाटप करणार हा प्रश्नच अाहे.

शेतकऱ्यांना अार्थिक पाठबळ देण्यासाठी या वेळी पीककर्जाची मर्यादा वाढवत कोट्यवधींचा लक्ष्यांक अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांना देण्यात अाला होता. अकोल्याला १३३४ कोटी तर बुलडाणा जिल्ह्यात १७४५ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दीष्ट देण्यात अाले होते.
एक एप्रिलपासून पीक कर्जवाटपाला सुरवात झाली. जूनपासून पीक कर्जवाटपाने खऱ्या अर्थाने गती घेतली. मात्र अवघे महिना-दीड महिना पीक कर्जवाटप वेगाने झाल्यानंतर पुन्हा एकदा गती संथ झाली. हंगाम संपायला अालेला असताना केवळ ३० टक्केसुद्धा पीक कर्जवाटप झालेले नाही. मुख्यमंत्र्यांपासून जिल्हा यंत्रणेतील अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच बँकांना पीक कर्जवाटप करण्याबाबत सूचना केल्या. कारवाईचा अासूड उगारण्याचे इशारेही देण्यात अाले. प्रत्यक्षात याचा काहीही फायदा झालेला दिसत नाही.      

अकोला जिल्ह्यात सर्व बँकांना मिळून १३३४ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करायचे होते. प्रत्यक्षात वाटप केवळ ४०४ कोटी रुपये झाले अाहेत. सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांना हे पीककर्ज मिळाले. लक्ष्यांकाच्या तुलनेत हे केवळ ३० टक्केच पीक कर्जवाटप झाले. दुसरीकडे बुलडाण्याला वऱ्हाडात सर्वाधिक १७४५ कोटींचा लक्ष्यांक देण्यात अाला होता. पण बँकांना अर्धा टप्पाही गाठता अालेला नाही. राष्ट्रीयीकृत बँकांनी १२२४ कोटींच्या तुलनेत ३६८ कोटींचे वाटप केले तर इतर बँकांची मजल १२६ कोटींचे पीक कर्जवाटपापर्यंत पोचली.

या जिल्ह्यात पीक कर्जवाटपाची टक्केवारी २८.३३ एवढी अाहे. तीन लाख २८ हजार ६६५ खातेदार शेतकऱ्यांपैकी  ६७ हजार ३९६ शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले अाहे. या जिल्ह्यात अद्यापही २ लाख ६१ हजारांपेक्षा अधिक शेतकरी पीककर्जापासून वंचित अाहेत.

रब्बीचे कसे होणार ?
खरिपात पीक कर्जवाटप ३० टक्क्यांच्या अात राहिलेले अाहे. हजारो शेतकरी पीककर्जापासून वंचित अाहेत. रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून पुढील अाठवड्यापासून पेरण्यांना सुरवात होत अाहे. अशा परिस्थितीत रब्बीसाठी नियोजित केलेले पीककर्ज तरी वेळेत बँका देतील काय असा प्रश्न निर्माण होत अाहे.

इतर ताज्या घडामोडी
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...