केवळ २४ हजार शेतकऱ्यांना दहा हजाराची उचल
मारुती कंदले
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

२४ कोटींचे वाटप
राज्यात १ कोटी ३६ लाख खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ८९ लाख शेतकरी संस्थात्मक कर्जपुरवठ्यात सहभागी आहेत. तरीही या योजनेअंतर्गत १४ ऑगस्टपर्यंत फक्त २४ हजार १३१ शेतकऱ्यांनाच उचल मिळाली आहे. त्यांना २४ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत साशंकता आहे.

मुंबई : खरीप हंगामात राज्य सरकारने जाहीर केलेली तातडीची दहा हजार रुपयांची उचल राज्यातील फक्त २४ हजार शेतकऱ्यांना मिळाली आहे. या शेतकऱ्यांना २४ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे.

तातडीने गरजू शेतकऱ्यांना दहा हजार रुपये कर्ज देण्याच्या योजनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. बँकांना हमी देऊनही ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे; परंतु लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष लाभ मिळालेले शेतकरी यांची आकडेवारी बघितल्यास राज्य सरकारची ही घोषणा हवेतच विरून गेल्याचे चित्र आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून कर्जमाफीसह हमीभाव मिळावा या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले होते. त्याआधी सरकारने थकबाकीदार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, अशी भूमिका घेतली होती; मात्र त्यानंतरही राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरूच राहिल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला. त्यानंतर सरकारने निकषांसह दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. 

मात्र या प्रक्रियेला विलंब लागणार असल्याने तोपर्यंत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी १० हजार रुपयांची उचल जाहीर करण्यात आली. खरिपासाठी बियाणे, खते आदी बाबींसाठी ही रक्कम उपयोगी पडेल, अशी अपेक्षा होती; मात्र राज्य सरकारच्या या घोषणेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. 

राज्य सरकारने सर्व जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांनी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या सर्व शेतकऱ्यांना खरिपासाठी १० हजार रुपयांचे तातडीचे कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले. तातडीच्या मदतीचा लाभ केवळ गरजू शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी राज्य सरकारने काही निकष ठरवले होते.

जे शेतकरी संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत, अशाच शेतकऱ्यांना हे कर्ज मिळणार होते. कर्ज देताना शेतकऱ्यांकडून अपात्र आढळल्यास कर्जाची रक्कम व्याजासह वसूल केली जाणार असल्याचे शपथपत्र लिहून घेण्यात येत आहे. 

१४ जून रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने बँकांना १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती. प्रत्यक्षात २४ दिवसांनी ४ जुलै रोजी सरकारने बँकांना हमी दिली. यात मोठा कालापव्यय गेल्याने तोपर्यंत केवळ १०८२ शेतकऱ्यांनाच १० हजार रुपयांची उचल मिळाली.

२४ कोटींचे वाटप
राज्यात १ कोटी ३६ लाख खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ८९ लाख शेतकरी संस्थात्मक कर्जपुरवठ्यात सहभागी आहेत. तरीही या योजनेअंतर्गत १४ ऑगस्टपर्यंत फक्त २४ हजार १३१ शेतकऱ्यांनाच उचल मिळाली आहे. त्यांना २४ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत साशंकता आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
लिंगभेद मानण्याची मनोवृत्ती बदलावीपुणे ः ‘मुलगाच पाहिजे’चा कुटुंबातून होणारा...
...या गावाची मुलगी म्हणून मी पुढाकार...राजस्थानमधील सोडा गावच्या सरपंच छवी राजावत यांनी...
‘पंदेकृवि’च्या कुलगुरुपदी डॉ. विलास भालेमुंबई/अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
शेतकरी कापूस न विकता गाठी विकणारवाशीम : शेतकऱ्यांनी या हंगामात पिकवलेला...
कर्जमाफीसाठी वऱ्हाडातून पाच लाख अर्ज अकोला : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान...
ऑनलाइन गाळप परवाने ऑक्टोबरपासूनपुणे : राज्यातील साखर कारखान्यांना यंदाचा गाळप...
देशातील कापूस पीकक्षेत्रात १९ लाख... नवी दिल्ली ः देशातील भात, भरडधान्ये, तेलबिया...
राहुरी : कृषी विद्यापीठात उद्यापासून...राहुरी, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि...
जमिनीतील क्षारांचे व्यवस्थापनमीठ (क्षार) यांच्या वापरामुळे होणारे दीर्घकालीन...
देशी पशुधनांची दूध उत्पादकता... शहनशहापूर, उत्तर प्रदेश ः अापला देश मोठा दूध...
पारंपरिक शेतीला दिली फळबागेची जोडपुणे येथे वाहतूक व्यवसाय सांभाळून रावसाहेब ...
गोड ज्वारी : खरीप ज्वारीस पर्यायी पीक गोड ज्वारी ही आपल्या नेहमीच्या खरीप...
जिरायती भागात वेळेवर करा पेरणी जिरायती परिस्थितीत रब्बी पिकांच्या पाण्याचा ताण...
ठिबक अनुदानासाठी चुकीचे अर्ज रद्द होणार पुणे : कृषी खात्याच्या ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन...
थेट भाजीपाला विक्रीतून साधली आर्थिक...करंज (जि. जळगाव) येथील सपकाळे कुटुंबीय गेल्या आठ...
ज्वारी पीक संरक्षण किडींचा एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून...
शेतीमध्ये मीठ-क्षारांच्या वापराचे...मीठ (क्षार) हे खनिज असून, त्याच्या वापराने...
मांडव पद्धतीने पिकतोय सर्वोत्कृष्ट...अपघातामुळे अपंगत्व आले म्हणून खचले नाहीत. उलट...
उत्तर प्रदेशसह बिहारमधील साखर उत्पादन... नवी दिल्ली ः उत्तर प्रदेश पाठोपाठ बिहारमध्ये...
कृषी सहायकांनी सोडला अतिरिक्त पदभार अकोला ः रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात...