agriculture news in marathi, Crop plantation due to rain | Agrowon

पुणे जिल्ह्यात पावसामुळे खरिपातील पिके जोमात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

पुणे  ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिपातील भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन, भात अशा पिकांवर काही ठिकाणी रोग-किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे  ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिपातील भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन, भात अशा पिकांवर काही ठिकाणी रोग-किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात दोन लाख ३० हजार ८३० हेक्टरपैकी एक लाख ५५ हजार ८०७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी ६७ टक्के पेरणी झाली. जिल्ह्यात भातपिकांची ६१ हजार ७८३ हेक्टरवर पुनर्लागवड झालेल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे भात पीकवाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पुनर्लागवडी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. भोर, वेल्हा, मावळ या तालुक्यांत यांत्रिकीकरणाद्वारे ५९२ हेक्टरवर भात लागवड पिकांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. बाजरी पीकवाढीच्या अवस्थेत असून शिरूर, दौड, इंदापूर, बारामती व पुरंदर या तालुक्यांमध्ये पावसाअभावी पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली आहे.

जूनच्या सुरवातीच्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे मूग व उडीद या पिकांची पेरणी क्षेत्र कमी झाले आहे. सुरवातीस पेरलेले मूग पीक फुलोऱ्यांच्या अवस्थेत असून, शिरूर तालुक्यात काही ठिकाणी पावसाअभावी वाढीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. भुईमूग पीकवाढीच्या अवस्थेत आहेत. सोयाबीन पिकांचे सरासरी पाच हजार २०० हेक्टर क्षेत्र असून हे क्षेत्र भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव व बारामती तालुक्यांमध्ये आहे. जिल्ह्यामध्ये १८ हजार ७६६ हेक्टरवर सोयाबीन पिकांची पेरणी झाली आहे.

सोयाबीन पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सोयाबीन पिकांवर अल्प प्रमाणात पाने खाणारी अळी, चक्री भुंगे यांचा प्रादुर्भाव झाला असून, कृषी विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना सुचविल्या जात आहेत. मका पिके वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकांची शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांमध्ये अवघे ४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...