पावसाच्या खंडाचे खरीप पिकांवर सावट

पावसाच्या खंडाचे खरीप पिकांवर सावट
पावसाच्या खंडाचे खरीप पिकांवर सावट

पुणे : कोकण, विदर्भासह मध्य महाराष्ट्राच्या पश्‍चिमेकडील तालुक्यांमध्ये जुलै महिन्याच्या चांगला पाऊस झाला आहे. मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसात मोठा खंड पडला आहे. काही तालुक्यांमध्ये अवघ्या १ ते ५ दिवसांमध्ये अधिक पाऊस पडला आहे. तर काही तालुक्यांमध्ये सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाल्याने ‘खरीप’ धोक्यात आला आहे. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकत असून, दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. तर काही ठिकाणी पेरण्याही रखडल्याचे चित्र आहे.  कृषी विभागाकडील नाेंदीनुसार दिवसभरात २.५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असेल तर तो पाऊस दिवस गणला जातो. अन्यथा तो कोरडा दिवस मानला जातो. नगर, पुणे, सोलापूर जिल्‍ह्यांत पावसाचा मोठा खंड असल्याचे दिसून आले आहे. सोलापूर जिल्ह्यात केवळ ३ ते ६ दिवस पाऊस पडला आहे. नगर पश्‍चिम भागात असलेल्या अकोले तालुका वगळता सर्व तालुक्यांमध्ये १ ते ७ दिवस पाऊस पडला. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. जळगाव, नंदूरबार, धुळे जिल्ह्यातही काही तालुक्यांत अनेक दिवस कोरडे हवामान होते. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस कमी असल्याचे दिसून आले आहे.  २४ जुलैपर्यंतच्या पावसाचा विचार करता नाशिकमधील देवळी २२ टक्के (७ दिवस), नगरमधील शेगाव २४ टक्के (२), राहाता १८ टक्के (२), सोलापुरातील उत्तर सोलापूर २४ टक्के (३), करमाळा २१ टक्के (३), सांगलीतील जत २२ टक्के (१२), आटपाडी १ टक्के (१) येथे पावसाने मोठी ओढ दिली आहे. तर बऱ्याच तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के नोंद झाली पावसाने दिवस कमी असल्याने खंड असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या भागात जोरदार पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. कमी अधिक पावसावर पेरण्या उरकून घेतलेल्याने राज्यात पेरणीचे एकूण क्षेत्र वाढले आहे. मात्र, पावसाअभावी पिके कोमेजली असून, या भागात दुबार पेरण्यांचे संकट ओढावणार आहे.  कमी दिवसांत अधिक पाऊस राज्यातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, बीड जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये अवघे चार ते पाच दिवस पाऊस पडला आहे. मात्र पावसाचा जोर अधिक असल्याने या तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक दिसत आहे. श्रीरामपूर तालुक्यात अवघ्या ४ दिवसांत १२९ टक्के पाऊस पडला असून, उर्वरीत २० दिवस या भागात पावसाची मुख्यतः उघडीप आहे. त्याचाही परिणाम पेरणी झालेल्या पिकांवर होणार आहे. यात नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात चार दिवसांत ५३ टक्के, पाथर्डीत चार दिवसात ५८ टक्के, पुणे जिल्ह्यातील शिरूर, इंदापूर दौंड तालुक्यामध्ये चार दिवसांत सरासरीच्या अनुक्रमे ६२ टक्के, ५४ टक्के, ७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर सोलापुरातील बार्शी येथे पाच दिवसांत ५३ टक्के, साताऱ्यातील फलटण तालुक्यात पाच दिवसांत ५३ टक्के अाणि बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यात चार दिवसांत ५५ टक्के, आष्टी तालुक्यात पाच दिवसांमध्ये ५० टक्के, तर तालुक्यात ४ दिवसांत सरासरीच्या ५६ टक्के पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.  २४ जुलैपर्यंत राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेले तालुके (कंसात पावसाचे दिवस)  नाशिक : मालेगाव ३० (५), नांदगाव २७ (४), येवला ३०(५), देवळी २२ (७). धुळे : शिंदखेडा ४२ (७),  जळगाव : चाळीसगाव ४३ (८),  नंदूरबार : नंदूरबार ३० (८), शहादा ३२ (७), नगर : परनेर ३७ (२), श्रीगोंदा २८ (१), कर्जत ३१ (२), शेगाव २४ (२), नेवासा ४७ (५), संगमनेर ४७.१ (६), कोपरगाव ४० (६), राहाता १८ (२), पुणे : बारामती ४७ (२),  सोलापूर : उत्तर सोलापूर २४ (३), दक्षिण सोलापूर ३४ (६), अक्कलकोट ३१ (६), मोहोळ २९ (२), माढा २९ (३), करमाळा २१ (३), पंढरपूर ४२ (४), सांगोला २७ (२), माळशिरस ३६ (२),  मंगळवेढा ३२ (४),  सातारा : मान दहिवडी ४५ (२),  सांगली : जत २२ (२), आटपाडी १ (१),  औरंगाबाद : वैजापूर ३८ (३), कन्नड २७ (७), खुलताबाद २८ (७), सिल्लोड ४२ (७), सायगाव ४४ (९), फुलांब्री ३२ (७),  बीड : गेवराई ३३ (४), अंबाजोगाई २७ (८), परळी २३ (३), धारूर ३७ (६), वडवणी  ३४ (६), शिरूर कासार (४), लातूर : औसा ४८ (११), अहमदपूर ३२ (८), उदगीर ३२ (८), चाकूर २६ (९), रेणापूर ३८ (८), दावणी ४६ (८), जळकोट ३१ (८). उस्मानाबाद : परांडा ४३ (४), भूम ३८ (७),  नांदेड : बिलोली ३४ (९), मुखेड ४० (७), देगलूर २५ (७),  परभणी : पालम २९ (६), सेलू ४६ (७), सोनपेठ ३१ (६), 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com