agriculture news in marathi, Crop production analysis in pune division, Maharashtra | Agrowon

पुणे विभागात ९९८ पीककापणी प्रयोग पूर्ण
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

पुणे : पिकांची नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पीक कापणी प्रयोग घेण्यात येत आहेत. चालू वर्षी खरीप हंगामातील पिकांचे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २८६ महसूल मंडलांत चार हजार ८३८ कापणी प्रयोग घेण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ९९८ पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्याची माहिती पुणे विभागाचे विभागीय सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी दिली.

पुणे : पिकांची नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पीक कापणी प्रयोग घेण्यात येत आहेत. चालू वर्षी खरीप हंगामातील पिकांचे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २८६ महसूल मंडलांत चार हजार ८३८ कापणी प्रयोग घेण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ९९८ पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्याची माहिती पुणे विभागाचे विभागीय सहसंचालक विजयकुमार इंगळे यांनी दिली.

पिकांच्या दर हेक्टरी सरासरी उत्पन्नाचे जिल्हा व राज्य पातळीवर विश्वासार्ह अंदाज काढणे, नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी तीन ते पाच वर्षांची सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी तालुका पातळीवर दहा वर्षांची पिकांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पीकविमा योजनेसाठी मंडल स्तरावरील चालू वर्षी मिळालेल्या पिकांच्या दर हेक्टरी उत्पन्नाची माहिती पीकविमा कंपनीस कळविण्यासाठी दरवर्षी पीक कापणी प्रयोग घेण्यात येतात.

त्यासाठी कृषी विभागातील सर्व पातळीवरील अधिकारी पिकांच्या उत्पादनाचा रँडम पद्धतीने अंदाज काढतात. या वेळी महसूल विभागाचे तलाठी, जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक आदी उपस्थित असतात. त्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

पीक कापणी प्रयोगामध्ये जिरायती व बागायती भात, जिरायती व बागायती भात, जिरायती व बागायती बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, भुईमूग, कारळा, सोयाबीन, तीळ, नाचणी कापूस, तीळ, सूर्यफूल आदी पिकांचे पीक कापणी प्रयोग घेतले जात आहे. मूग आणि उडीद पिकांचे पीक कापणी प्रयोग घेऊन, त्यांची माहिती कंपनीला सादर करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे.

कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मुगाचे ४३२ आणि उडदाचे २१६ पीक कापणी प्रयोग घेतले असून, त्यांची माहिती कंपनीला सादर केली आहे. जिरायती व बागायती बाजरीचे १०६४ पैकी ३५० पीक कापणी प्रयोग घेतले आहे. सध्या त्यांची माहिती संकलित करण्याचे कामे सुरू असून, उर्वरित पीक कापणीचे कामे सुरू आहेत. यंदा विभागातील नगर जिल्ह्यात एकूण एक हजार ९३८ पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहे. पुणे जिल्ह्यात एक हजार ३८६, सोलापूर जिल्ह्यात एक हजार ५१४ पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहेत.

सध्या मूग आणि उडदाचे पीककापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. बाजरीचेही साडेतीनशे प्रयोग पूर्ण झाले आहे. उर्वरित पिकांचे टप्प्याटप्प्याने पीक कापणी प्रयोग घेऊन त्यांची माहिती संकलित करून विमा कंपनीला व आयुक्त कार्यालयाला जमा केली जाईल.
- विजयकुमार इंगळे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी.

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...