बुलडाण्यात पिकांची उत्पादकता सरासरीपेक्षा अधिक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : खरीप हंगामात पिकांची प्रत्यक्ष उत्पादकता अत्यंत कमी असल्याचे शेतकरी वारंवार सांगत असले, तरी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले अाहे. यंत्रणांनी काढलेली उत्पादकता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची टीका शेतकऱ्यांमधून होऊ लागली अाहे.

विशेषतः मूग, उडदाचे काहीच पीक अालेले नसताना प्रशासनाने सरासरीपेक्षा अधिक उत्पादकता काढली अाहे. जिल्हा यंत्रणांनी विभागीय सहसंचालकांमार्फत शासनाकडे उत्पादकतेची माहिती सादर केली अाहे. बुलडाणा जिल्ह्यात या वर्षी मुगाची हेक्टरी उत्पादकता ५४८.३ किलो दाखविण्यात अाली.

या जिल्ह्यात सरासरी उत्पादकता ४९४ किलो एवढी अाहे. उडदाची सरासरी उत्पादकता ४७७ किलो असताना या वर्षी ५४२.६ किलो उत्पादकता दर्शविण्यात अाली. सोयाबीनची १०९२ किलो सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत ११३७.५ किलो उत्पादकता दाखवण्यात अाली. अकोला जिल्ह्यात सोयाबीन पिकाची उत्पादकता १००१.८१ किलोच्या तुलनेत ६७७.३ किलो अालेली अाहे, तसेच मुगाची उत्पादकता वाढलेली अाहे. मुगाची ३४१.२० किलोच्या तुलनेत उत्पादकता ३६८.३ किलो मिळाली अाहे, तर उडदाची ३४८ किलोच्या तुलनेत ३१६.३ किलो निघाली अाहे.

वाशीम जिल्ह्यात मुगाची उत्पादकता या हंगामात ४९४, उडदाची ५५३.६ अाणि सोयाबीनची ७९१.८ अाली अाहे. खरीप हंगामात पीककापणी प्रयोगांच्या अाधारावर उत्पादकता निश्चित केली जाते. सध्या मूग, उडीद, सोयाबीन या तीन पिकांची उत्पादकता सादर झालेली असून, कापसाच्या उत्पादकतेची माहिती मिळू शकली नाही.

प्रशासनाकडे काढलेली उत्पादकता वस्तुस्थितीला धरून नाही. या मोसमात खरिपात पावसाअभावी प्रचंड नुकसान झाल्याचे शेतकरी नेते मनोज तायडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com