खरीप पीक क्षेत्र साडेअाठ लाख हेक्टरने कमी

खरीप पीक क्षेत्र
खरीप पीक क्षेत्र

नवी दिल्ली ः यंदा खरीप पीक क्षेत्रात साडेअाठ लाख हेक्टरने घट झाली अाहे. गेल्या शुक्रवार (ता. ८)पर्यंत देशात खरीप पिकाने १०४१.१७ लाख हेक्टर क्षेत्र व्यापले होते.

गेल्या वर्षी याच कालावधीत १०४९.८७ लाख हेक्टरवर पीक क्षेत्र होते. यंदा मुख्यतः भात, कडधान्ये, भरडधान्ये, तेलबिया पीक क्षेत्रात घट झाली अाहे. तर कापूस लागवड क्षेत्रात १७.९६ लाख हेक्टरने वाढ झाली अाहे, असे कृषी मंत्रालयाने दिलेल्या अाकडेवारीवरून दिसून येत अाहे.

कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अाकडेवारीनुसार, भात पीक क्षेत्र ३७१.८९ लाख हेक्टरवर पोचले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३७६.८९ लाख हेक्टरवर भात पीक क्षेत्र होते. कर्नाटक, अासाम, तमिळनाडू, तेलंगणमध्ये भात पीक क्षेत्र कमी झाले अाहे.

कडधान्ये पेरणी १३९.१७ लाख हेक्टरवर झाली अाहे. गेल्या वर्षी १४४.८४ लाख हेक्टर क्षेत्र कडधान्ये पिकाने व्यापले होते. भरडधान्ये पीक क्षेत्र १८३.०६ लाख हेक्टरवर पोचले अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक क्षेत्र कमी अाहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भरडधान्ये पीक क्षेत्र अधिक अाहे. तर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकात भरडधान्ये पीक क्षेत्र कमी अाहे. विशेषतः ज्वारी पीक क्षेत्र कमी झाले अाहे. तर बाजरी पीक क्षेत्रात वाढ झाली अाहे.

तेलबिया पीक क्षेत्रात १७.९६ लाख हेक्टरने घट झाली अाहे. यंदा १६९.२० लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची पेरणी झाली अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १८७.१६ लाख हेक्टरवर तेलबिया पीक क्षेत्र होते. सोयाबीन पीक क्षेत्र ११४ लाख हेक्टरवरून १०५ लाख हेक्टरपर्यंत कमी झाले अाहे. ऊस लागवड क्षेत्रात वाढ ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली अाहे. ऊस पीक क्षेत्र ४९.८८ लाख हेक्टरवर पोचले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४५.६४ लाख हेक्टरवर पीक क्षेत्र होते. कापूस लागवड क्षेत्रात १७.९६ लाख हेक्टरने वाढ झाली अाहे. यंदा १२०.९८ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली अाहे. गेल्या वर्षी १०१.७२ लाख हेक्टरवर कापूस पीक क्षेत्र होते. ताग लागवड क्षेत्र ७.५६ लाख हेक्टरवरून ७.०५ लाख हेक्टरपर्यंत कमी झाले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com