agriculture news in marathi, crops damage in natural disaster, yavatmal, maharashtra | Agrowon

नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाने संयुक्‍तरीत्या तयार करीत शासनाकडे सादर केला आहे. या नुकसानीच्या भरपाईपोटी सुमारे ४४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाने संयुक्‍तरीत्या तयार करीत शासनाकडे सादर केला आहे. या नुकसानीच्या भरपाईपोटी सुमारे ४४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने ६२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामध्ये जून महिन्यात ७६२ हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला. ५०१ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. या क्षेत्राकरिता ४२ लाख ७९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात ६८६० शेतकऱ्यांचे ३२६७ हेक्‍टरचे नुकसान झाले. याकरिता दोन कोटी २२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ५४ हजार ९८१ शेतकऱ्यांचे ४५  हजार ८८० हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, असे अहवालात नमूद आहे. यामध्ये ३३ टक्‍क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता मदतीची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ४३ कोटी ९६ लाख ८७ हजार रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.

कंपनीकडून अद्यापही भरपाईच नाही
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासकीय मदतीचे वितरण काही शेतकऱ्यांना करण्यात आले. परंतु कंपन्यांकडून मिळणाऱ्या मदतीची मात्र शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षाच आहे. त्यासोबतच नुकसानीपोटी मिळणाऱ्या विमा रकमेच्या लाभापासूनदेखील शेतकरी वंचित आहेत.परिणामी ही मदत मिळणार किंवा नाही याबाबत शेतकऱ्यांमधून साशंकता व्यक्‍त केली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...