जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
बुलडाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांचा मी गेल्या तीन दिवसांत दौरा केला आहे. या वेळी शेतकऱ्यांशी चर्चा करताना प्रत्येकाने सोयाबीनचे एकरी अवघे साडेतीन क्विंटल उत्पादन झाल्याचे सांगितले. परंतु प्रशासनाला हाताशी धरून सरकारकडून खोटा अहवाल तयार केला जात आहे. विमा कंपन्याचे हित जपण्यासाठी हा सारा प्रकार सुरू आहे. विमा कंपन्या, सरकारी अधिकारी, शासन यांची यात मिलीभगत आहे.
- राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना
अमरावती ः पश्चिम विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असतानाच खरिपाची नजरअंदाज पैसेवारी सरासरी ६६ पैसे घोषित करण्यात आल्याने शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नजरअंदाज पैसेवारी कमी जाहीर करु नका, अशा अलिखित सूचना शासनानेच अधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहे.
या वर्षीच्या खरीप हंगामात सुरवातीला पाऊस उशिरा झाल्याने मूग, उडदाला याचा फटका बसला. त्यानंतर फुले लागणे आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्याने सोयाबीनही शेतकऱ्यांच्या हातून गेले. फुलोरा अवस्था, तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेतच या पिकाला पावसाची गरज असते. अमरावती विभागात १० ऑगस्टपासून पावसाने दडी मारली. अमरावती जिल्ह्यात सरासरीच्या ७८, यवतमाळ जिल्हयात ७८ तर बुलडाणा जिल्ह्यात ७० टक्के इतक्या पावसाची नोंद झाली. अकोला व वाशीम जिल्ह्यात १०१ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. विभागातील तीन जिल्ह्यांत पावसाने सरासरीदेखील गाठली नसताना शासनाच्या लेखी मात्र सारे अलबेल असल्याचे नजरअंदाज पैसेवारीवरुन सिद्ध होत आहे.
मूग, उडदात किमान ४० टक्के तुटीचा अंदाज जाणकार व्यक्त करतात. परंतु शासनाने ६६ टक्के पैसेवारी जाहीर करीत शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
- 1 of 348
- ››