agriculture news in Marathi, crops from Khandesh in trouble, Maharashtra | Agrowon

खानदेशात पीके पाण्याअभावी कोमजली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मंगरूळ प्रकल्प जुलैमध्येच १०० टक्के भरायचा. मागील वर्षी तो सप्टेंबरमध्ये भरला होता. यंदाही पावसाचा खंड पडल्याने तो भरण्याची शक्यता आहे.
- रमेश पाटील, शेतकरी, मंगरूळ, जि. जळगाव

जळगाव ः जळगाव आणि धुळे जिल्ह्यात मागील १० ते ११ दिवसांपासून पावसाने आोढ दिली आहे. उकाडा व उष्णता वाढल्याची स्थिती आहे. परिणामी, खरिपाची पिके पाण्याअभावी कोमेजू लागली असून, त्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

जिल्ह्याच्या पूर्व भागातील रावेर, यावल, बोदवड व मुक्ताईनगरात पाऊस नाही. ऊन तापत असल्याने हलक्‍या, मुरमाड जमिनींच्या भागात पिके कोमेजू लागली आहेत. उडीद, मूग ही पिके फुलोऱ्यावर आहेत. काही ठिकाणी मुगाला शेंगा लागत आहेत. अशा स्थितीत जोरदार पावसाची अपेक्षा आहे. पावसाअभावी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. हलक्या जमिनीत फूलगळ, दाणे न भरणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. कोरडवाहू कापसाचे पीक बरे आहे. पूर्वहंगामी कापसात फुले, पाते लागत आहेत. काळ्या कसदार जमिनीत पिके तग धरून आहेत. 

रावेर, यावलमधील सुकी, अभोरा, मंगरूळ, मोर या प्रकल्पांमधील जलसाठा ५० टक्‍क्‍यांच्या खालीच आहे. चोपडा तालुक्‍यातील गूळ, अनेर प्रकल्पातही जलसाठा कमीच आहे. अनेर प्रकल्पात तर फक्त २३ टक्के जलसाठा आहे. तर पश्‍चिम भागातील अग्नावती, बहुळा, भोकरबारी, तोंडापूर, मन्याड, अंजनी या प्रकल्पांमध्ये साठा नाही. जुलैमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. 

धुळे जिल्ह्यातही पावसाचा खंड पडला आहे. जिल्ह्यात पश्‍चिम भागात साक्री तालुक्‍यातील मुरमाड जमिनींच्या भागात पीकस्थिती नाजूक बनत आहे. तर शिंदखेडा व धुळे तालुक्‍यातील पूर्व भागातही पावसाची नितांत गरज आहे. जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरीच्या ४० टक्केही पाऊस झाला नाही. अमरावती प्रकल्प कोरडाच आहे. पांझरा प्रकल्पात थोडा जलसाठा आहे. तापी नदी वगळता इतर नद्यांना चांगला पूर आलेला  नाही. 

इतर अॅग्रो विशेष
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
मध्यस्थविरहीत विक्री व्यवस्था उभी...अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवशनवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...