agriculture news in marathi, crops may damage due to lack of rain,satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिके पाण्यावाचून करपू लागली आहे. सरासरी इतका पाऊस होऊनही पिकांच्या आवश्यकतेनुसार पाऊस नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.

सातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिके पाण्यावाचून करपू लागली आहे. सरासरी इतका पाऊस होऊनही पिकांच्या आवश्यकतेनुसार पाऊस नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात खरिपाच्या सुरवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या केल्या होत्या. या हंगामात सरासरीपेक्षा जास्त पेरण्या झाल्या होत्या. यामध्ये सोयाबीन, बाजरी, भात, भुईमूग आदी पिकांचा समावेश आहे. त्यानंतर पाऊस दमदार सुरूच राहिल्याने पिकांची वाढ जोमदार झाली होती. त्यामुळे हा खरीप फायदेशीर ठरणार अशी अाशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. या पावसाने जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ९५ टक्क्यांवर पाणीसाठा झाला.

याच दरम्यान पिकांची भरणी सुरू झाली असतानाच पावसाने दडी मारल्याने पिके भरण्यावर परिणाम झाला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाल्यावर तर कडक ऊन पडण्यास सुरवात झाली. एकीकडे पाऊस गायब व दुसरीकडे कडक ऊन यामुळे पिके आता करपू लागली आहे. उशिरा पेरणी झालेल्या पिकांना पाऊस नसल्याचा मोठा फटका बसू लागला आहे. पिके करपू लागली असून ऊस लागवडही ठप्प झाली आहे.

दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत सुरवातीच्या काळातच कमी पाऊस झाला होता. यामुळे पिकांच्या वाढीवरही काहीसा परिणाम झाला होता. सध्या पावसाचे होत असलेले मोजमाप ही चुकीचे ठरत आहे. एकाच तालुक्यात भिन्न भिन्न स्थिती असल्याने एका भागात जास्त तर एका भागात कमी असे असतानाही तालुक्याचा सरासरी पाऊस मोजला जातो. या मोजमापाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

महाबळेश्वर, पाटण, जावली, सातारा या तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी झाली होती. मात्र सध्या पाऊस नसल्याने पाणीटंचाई जाणवू लागल्याने पिके हातची जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन जगवण्याचा प्रयत्न करीत आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास हाताला तोंडाला आलेले पीक जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...