agriculture news in marathi, CROPSAP to be implemented with the help of Agri students | Agrowon

क्राॅपसॅप योजना ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांमार्फत राबविणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 जून 2018

पुणे : यंदाच्या खरिपात कीड राेगांच्या प्रादुर्भावाची संभाव्य लक्षणे आेळखण्याबराेबरच कीटकनाशके फवारण्याचा सल्ला देण्यासाठी क्राॅपसॅप याेजना कृषी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमार्फत राबविणार आहाेत, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी दिली, तर शेतकरी काेणते बियाणे वापरताे, याबराेबरच पेरणीच्या वेळी याेग्य सल्ला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी विभागातील शिपाई ते मंत्री शेतकऱ्यांबराेबर पेरणी करणार आहे. ‘सेल्फी विथ फार्मर‘ अभियानाची घाेषणादेखील त्यांनी केली. 

पुणे : यंदाच्या खरिपात कीड राेगांच्या प्रादुर्भावाची संभाव्य लक्षणे आेळखण्याबराेबरच कीटकनाशके फवारण्याचा सल्ला देण्यासाठी क्राॅपसॅप याेजना कृषी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमार्फत राबविणार आहाेत, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी दिली, तर शेतकरी काेणते बियाणे वापरताे, याबराेबरच पेरणीच्या वेळी याेग्य सल्ला शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी विभागातील शिपाई ते मंत्री शेतकऱ्यांबराेबर पेरणी करणार आहे. ‘सेल्फी विथ फार्मर‘ अभियानाची घाेषणादेखील त्यांनी केली. 

राज्याची खरिप आढावा बैठक साेमवारी (ता.४) मंत्री खाेत यांनी घेतली. या वेळी कृषी आयुक्त सचिंद्रप्रसाद सिंह यांच्यासह विविध संचालक उपस्थित हाेते. 
या वेळी मंत्री खाेत म्हणाले, की यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बॅंक प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक आणि कृषी विभागाची बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठीच्या विभागीय बैठका मी स्वतः घेणार असून, कर्जमाफी आणि पीककर्जाचा आढावा घेत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने पीककर्ज देण्याचे आदेश देणार आहे. ज्या बॅंका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणार आहेत, त्यांच्यावर कारवाईची शिफारस केली जाणार आहे. 

खरिपात कीडराेगांची संभाव्य लक्षणे आेळखण्याबराेबरच शेतकऱ्यांना याेग्य सल्ला देण्यासाठी कृषी विद्यापीठे, महाविद्यालये आणि कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांमार्फत क्रॉपसॅप याेजना राबविणार आहाेत. यासाठी विद्यार्थी आणि कृषी सहायकांचा गट करण्यात येणार आहे. गटांद्वारे कीड राेग सर्व्हेक्षण केले जाईल. तसेच बाेंड अळीचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी ५ लाख प्लाॅट निवडण्यात आले असून, त्या ठिकाणी कामगंध सापळे लावण्यात येणार आहेत, तर २० लाख कामगंध सापळ्याचे नियाेजन करण्यात आले आहे. कपाशीच्या बीटी बियाण्यांना पर्याय देण्यासाठी देशी बियाणे उत्पादनाचे आदेश कृषी विद्यापीठांना दिले असून, टप्प्याटप्प्याने देशी बियाणेदेखील काही वर्षांत उपलब्ध हाेईल. 

बनावट बियाणे आणि शिफारस नसलेली कीटनाशके विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याबराेबरच त्यांच्यावर फाैजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांपासून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी आणि कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याचेही मंत्री खाेत यांनी सांगितले. 

अधिकाऱ्यांसाठी ‘सेल्फी विथ फार्मर’ अभियान 
पेरणीच्या कालावधीमध्ये शेतकरी काेणते बियाणे, खत वापरत आहे याची माहिती संकलित करण्यासाठी शिपाई ते मंत्री सर्वजण एक दिवस शेतकऱ्यांबराेबर पेरणी करणार आहे. या अभियानामध्ये शेतकऱ्यांकडून सविस्तर फॉर्म भरून घेतला जाणार असून, सेल्फी विथ फार्मर अभियान राबवले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्येही उत्साह निर्माण हाेणार आहे. सर्व लाेकप्रतिनिधींनी सरपंच, आमदार, खासदार आणि सर्व मंत्र्यांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केले.
 

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...