agriculture news in marathi, cropsap surveyor will put in the black list | Agrowon

कीडरोग सर्व्हेक्षकांना टाकणार काळ्या यादीत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

नागपूर : कीडरोग सर्व्हेक्षकांनी आपल्या विविध मागण्यांकरिता १५ डिसेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढला होता. त्याकरिता १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत सुटी मिळावी व पगार कपात करू नये, अशी मागणी केली. कृषी विभागाने मात्र तुम्ही आमचे कर्मचारीच नसल्याचे सांगत आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली आहे.

नागपूर : कीडरोग सर्व्हेक्षकांनी आपल्या विविध मागण्यांकरिता १५ डिसेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढला होता. त्याकरिता १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत सुटी मिळावी व पगार कपात करू नये, अशी मागणी केली. कृषी विभागाने मात्र तुम्ही आमचे कर्मचारीच नसल्याचे सांगत आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली आहे.

क्रॉपसॅप आणि हॉटसर्प प्रकल्पाअंतर्गत कीडरोग सर्व्हेक्षक म्हणून पुरवठादार संस्थेमार्फत कर्मचारी पुरविले जातात. या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत घेतले जावे आणि बारा महिने कीड सर्व्हेक्षणाचे काम मिळावे, याकरिता १५ डिसेंबर रोजी विधिमंडळावर मोर्चा काढला. या मोर्चासाठी १४ ते १६ डिसेंबर अशी सुटी मिळावी आणि पगार कापू नये, असा विनंतीअर्ज कृषी विभागाला कीड सर्वेक्षक संघटनेकडून देण्यात आला होता.

कृषी आयुक्‍तालयाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सु. ल. जाधव यांनी या संदर्भाने राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना लेखी आदेश देत आंदोलनकर्त्या कीड सर्व्हेक्षकांवर कारवाईची शिफारस केली आहे. क्रॉपसॅनप अंतर्गत संस्थेमार्फत कीडरोग सर्व्हेक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही उपोषण, मोर्चे काढून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो. करारनामा आणि मार्गदर्शक सूचनानुसार त्यांचा तसा कोणताही हक्‍क होत नाही.

रब्बी हंगामात काम देऊ नये
आंदोलनकर्त्यांवर कारवाईसाठी कर्मचारी पुरवठा करणाऱ्या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावावी. १४ डिसेंबरपासून कामावर गैरहजर असलेल्या आणि नियमबाह्य वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पगार कपातीचेदेखील आदेश देण्यात आले असून संप, आंदोलन करून कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रब्बी हंगाम व पुढील कंत्राट देता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...