agriculture news in Marathi, crores rupees turnover form mango career, Maharashtra | Agrowon

हापूस आंबा वाहतुकीतून कोट्यवधींची उलाढाल
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 मे 2019

रत्नागिरी : कोकणच्या हापूसची सर्वाधिक विक्री मुंबई, पुणे बाजारपेठेत होते. बागायतदारांकडील हापूसच्या पेट्या एकत्रित करून त्या वाहतूक कंपनीमार्फत बाजारात पाठविण्यात येतात. हंगामातील तीन महिन्यांत या वाहतुकीतून कोट्यवधीची उलाढाल रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होते. गाडी नेण्यासाठी चालक नेमला तर त्यालाही एका फेरीला किमान दीड हजार रुपये मानधन दिले जाते, तर चारचाकी गाडी मालकाला किमान साडेतीन ते चार हजार रुपये भाडे मिळते. 

रत्नागिरी : कोकणच्या हापूसची सर्वाधिक विक्री मुंबई, पुणे बाजारपेठेत होते. बागायतदारांकडील हापूसच्या पेट्या एकत्रित करून त्या वाहतूक कंपनीमार्फत बाजारात पाठविण्यात येतात. हंगामातील तीन महिन्यांत या वाहतुकीतून कोट्यवधीची उलाढाल रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होते. गाडी नेण्यासाठी चालक नेमला तर त्यालाही एका फेरीला किमान दीड हजार रुपये मानधन दिले जाते, तर चारचाकी गाडी मालकाला किमान साडेतीन ते चार हजार रुपये भाडे मिळते. 

कोकणची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या आंबा व्यवसायातून हजारो कोटींची दरवर्षी उलाढाल होते. मार्चपासून हंगाम सुरू होतो. बागेतून काढलेला आंबा गोडावूनला असून पेटी किंवा बॉक्‍समध्ये भरला जातो. ती पेटी मुंबई, पुण्यातील बाजारात पाठविण्यात येते. त्यासाठी वाहतूक कंपनीचे सहकार्य घेतले जाते. बाजारपेठेत सकाळच्या सत्रात आंब्याची खरेदी-विक्री होते. त्यामुळे रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीच्या विविध भागांतून पेट्या भरलेल्या गाड्या रवाना होतात. एका पेटीसाठी ९० रुपये आणि दहा रुपये कामगाराचे आकारतात. गाडी मालक नसला तरी तात्पुरता चालक तिथे पाठविला जातो.

मालक स्वतः असेल तर फायदा अधिक होतो. हौदा असलेल्या चारचाकी गाडीतून सुमारे १३० पेट्या नेण्यात येतात. मोठ्या गाड्यांमधून तीनशे, पाचशे तर ट्रकमध्ये अधिक पेट्या भरल्या जातात. आंबा वाहतुकीतून हंगामात वाहन मालक-चालक लाखो रुपये कमवतात. चारचाकी गाडीच्या एका फेरीला किमान दहा ते बारा हजार रुपये मिळतात.

इंधन, चालकाचा पगार यासह गाडीचा घसारा खर्च वगळून चार ते साडेचार हजार रुपये सुटतात. मोठी गाडी असेल तर सुमारे बारा ते पंधरा हजार रुपये मिळतात. यामध्ये वर्षाचा हप्ता दोन महिन्यांत कमवण्यावर भर असतो. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे वाहतुकीच्या फेऱ्यांवरही परिणाम झाला आहे. 

धोकाही अधिक 
गाडीमध्ये वजन असल्यामुळे वाहतूकदार, गाडीचा मालक आणि चालक यांची तेवढीच जबाबदारी राहते. उन्हाळी सुट्यांमुळे महामार्गावर वाहनांची संख्या अधिक असते. अनेक गाड्यांचे अपघातही होतात. हा धोका पत्करूनच हा व्यवहार सुरू असतो. तसेच बागायतदारांच्या पेट्यांची माहिती लिखित स्वरूपात दलालाकडे दिली जाते. एखादी पेटी अधिक गेली, तर ती दलाल स्वीकारत नाहीत. 

प्रतिदिन ३००० पेट्यांची उलाढाल
आंबा ट्रान्सपोर्ट करणारे रत्नागिरी तालुक्‍यात सुमारे बारा ते पंधरा व्यावसायिक आहेत. चिपळूण, दापोलीसह अन्य तालुक्‍यांतही काही प्रमाणात असे वाहतूकदार आहेत. सिंधुुदुर्ग जिल्ह्यातूनही अशी वाहतूक होते. सध्या दिवसाला एका वाहतूकदाराकडून सरासरी तीन हजार पेट्या मुंबई, पुण्याकडे रवाना होतात.

इतर अॅग्रो विशेष
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...
SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात...- सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात...
रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापनवनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...
राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणारनागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे...
राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासूनजळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड...
दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा (video...औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो...
Breaking : मॉन्सून अंदमानात दाखलपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८)...
बिगर नोंदणीकृत जैविक उत्पादनात खत...पुणे : शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या बिगर...