agriculture news in marathi, Crow productivity is 1 quintals 73 kg | Agrowon

परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १ क्विंटल ७३ किलो
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४ क्विंटल ३४ किलो (एकरी १ क्विंटल ७३ किलो) आली आहे. उडदाची सरासरी उत्पादकता ५ क्विंटल ३३ किलो (एकरी २ क्विंटल १२ किलो) आली आहे. कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून आढळून आले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मुगाची उत्पादकता २ क्विंटल २० किलोने, तर उडदाची उत्पादकता २ क्विंटल ४२ किलोने वाढली आहे.

परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४ क्विंटल ३४ किलो (एकरी १ क्विंटल ७३ किलो) आली आहे. उडदाची सरासरी उत्पादकता ५ क्विंटल ३३ किलो (एकरी २ क्विंटल १२ किलो) आली आहे. कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून आढळून आले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मुगाची उत्पादकता २ क्विंटल २० किलोने, तर उडदाची उत्पादकता २ क्विंटल ४२ किलोने वाढली आहे.

गेल्या पाच वर्षांतील मुगाच्या सरासरी उत्पादकतेपेक्षा यंदा सेलू, मानवत, पाथरी तालुक्यात मुगाची उत्पादकता कमी आली आहे. पाथरी तालुक्यात उडदाची उत्पादकता कमी आली आहे. यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता प्रतिहेक्टरी ५ क्विंटल प्रस्तावित करण्यात आली होती. यंदा मुगाच्या क्षेत्रात घट होऊन प्रत्यक्षात २४ हजार ३३८ हेक्टरवर पेरणी झाली होती.

पावसाच्या खंडामुळे अपेक्षित उत्पादकता मिळाली नाही. यंदा मुगाच्या ३२४ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले. २२१ प्रयोगापैकी २१७ प्रयोगांचे विश्लेषण करण्यात आले. त्यावरून उत्पादकतेचे हे प्रमाण समोर आले. गतवर्षीमध्ये सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी २ क्विंटल १५ किलो आली होती. परंतु गेल्या पाच वर्षांतील (२०१३ ते २०१७) सरासरी उत्पादकतेच्या (३ क्विंटल ८१ किलो) तुलनेत सेलू, मानवत, पाथरी या तालुक्यांतील उत्पादकता यंदा कमी आली आहे.

यंदा उडदाची प्रतिहेक्टरी उत्पादकता ३ क्विंटल ६० किलो प्रस्तावित करण्यात आली होती. प्रत्यक्षात ८ हजार १४९ हेक्टरवर पेरणी झाली. उडदाच्या ११२ पीक कापणी प्रयोगांपैकी ११५ प्रयोगाचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी  ५ क्विंटल ३२ किलो आली असल्याचे आढळून आले आहे.

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...