agriculture news in marathi, Crowd of devotees in madhi, nagar, maharashtra | Agrowon

कानिफनाथ महाराज समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी 
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मार्च 2019

मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख असलेल्या मढी (ता. पाथर्डी) येथे सोमवारी (ता. २५) यात्रोत्सवानिमित्त श्री कानिफनाथ महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राज्याच्या विविध भागांतून भाविक येथे दाखल झाले आहेत. मानाच्या काठ्या कळसाला टेकवण्यासाठी काठ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख असलेल्या मढी (ता. पाथर्डी) येथे सोमवारी (ता. २५) यात्रोत्सवानिमित्त श्री कानिफनाथ महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. राज्याच्या विविध भागांतून भाविक येथे दाखल झाले आहेत. मानाच्या काठ्या कळसाला टेकवण्यासाठी काठ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथ महाराज यांची मढी येथे संजीवन समाधी आहे. होळी पेटवून व कळसाला मानाच्या काठ्या लावून येथील यात्रेला सुरवात झाली. रंगपंचमीला (सोमवारी) यात्रेचा मुख्य दिवस असतो. त्यामुळे सोमवारी यात्रा उत्सावानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. राज्याच्या विविध भागांतून येथे भाविक येथे दाखल झाले आहेत. मानाच्या काठ्या कळसाला टेकवण्यासाठी ढोल-ताशा व डफाच्या गजरात मढी गडाला प्रदक्षिणा घालून काठ्यांची सवाद्य मिरवणूक काढली जात होती. भाविकांच्या सोयीसाठी राज्यभरात जादा एसटी गाड्या सोडण्यात आल्या. 

कानिफनाथ महाराज यांचा गुढीपाडव्याला समाधी सोहळा असतो. त्या दिवशी गंगाजलाने अभिषेक केला जातो. यंदा दुष्काळामुळे भाविकांची संख्या कमी आहे असे येथील नागरिकांनी सांगितले.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...