जळगाव जिल्ह्यात मागणी वाढल्यामुळे युरियाचा तुटवडा

खत देण्यास एकदम सुरवात झाल्याने मागणीतही वाढ झाली आहे. यामुळे विक्रेत्यांकडील युरियाचा साठा संपला असून, गुदामात साठा शिल्लक नाही. परंतु युरियाचा पुरवठा लागलीच होत असल्याने शेतकऱ्यांना कमतरता जाणवणार नाही. - मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
जिल्ह्यात मागणी वाढल्यामुळे युरियाचा तुटवडा
जिल्ह्यात मागणी वाढल्यामुळे युरियाचा तुटवडा

जळगाव : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा ७० टक्‍के पुरवठा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन होत असल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागतीच्या कामांना सुरवात केली आहे. उघडीप आणि पाऊस यामुळे पिकांना खतांची मात्रा देण्यासाठीची लगबग सुरू झाल्याने खतांच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात प्रामुख्याने युरिया आणि पोटॅश, फॉस्फेटचा तुटवडा जाणवू लागला आहे.

खरीप हंगामातील पेरण्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. उन्हाळी लागवड करण्यात आलेल्या कपाशीला खतांचा एक डोस दिला गेला असून, मॉन्सूनमधील लागवड झालेल्या पिकांना खत देण्याची सुरवात जिल्ह्यात या आठवड्यात झाली आहे. सद्यःस्थितीत ७० ते ७५ टक्‍के खतांचा पुरवठा झालेला आहे. परंतु, आता सर्वच शेतकऱ्यांकडून खतांची मागणी होऊ लागल्याने खतपुरवठा संपण्यावर आहे.

खतांचा तुटवडा जाणवू लागला असून, यात प्रामुख्याने युरिया, पोटॅश व फॉस्फेट या खतांची मागणी अधिक असल्याने विक्रेत्यांकडील मालही संपण्यावर आला आहे. जिल्ह्यात युरियाचा आजअखेरपर्यंत ३६ हजार २४५ मेट्रिक टन पुरवठा झाला असून, हा साठा संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विक्रेत्यांकडील असलेल्या साठ्यासह कृषी विभागाच्या गोदामात देखील युरियाचा साठा आता शिल्लक नाही. यामुळे युरियाचा पुरवठा लवकर झाला नाही, तर शेतकऱ्यांना युरिया मिळणे शक्‍य नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com