agriculture news in marathi, Crushing 62 lakh metric ton of sugarcane | Agrowon

औरंगाबाद विभागातील उसाचे ६२ लाख टनावर गाळप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद : मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखान्यांनी यंदा १० फेब्रुवारीपर्यंत ६२ लाख ८४ हजार ३५५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी १०.१८ टक्‍के साखर उताऱ्यानुसार ६३ लाख ९९ हजार ९९९ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले. 

औरंगाबाद : मराठवाडा व खानदेशातील २३ साखर कारखान्यांनी यंदा १० फेब्रुवारीपर्यंत ६२ लाख ८४ हजार ३५५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी १०.१८ टक्‍के साखर उताऱ्यानुसार ६३ लाख ९९ हजार ९९९ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळपात सहभाग घेतला. या पाच कारखान्यांनी ११ लाख ९७ हजार ४६३ मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी १०.४ टक्‍के उताऱ्याने १२ लाख ४५ हजार ४२५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी सरासरी १०. ६७ टक्‍के साखर उताऱ्याने १६ लाख २२ हजार ९६० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. त्यासाठी १५ लाख २१ हजार ३७७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले.

बीड जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी २४ लाख ५६ हजार ३०५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या   गाळपातून सरासरी ९.९३ टक्‍के साखर उताऱ्यानुसार २४ लाख ३८ हजार ८९५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. नंदूरबार जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ७ लाख ६० हजार ९४९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.९९ टक्‍के साखर उताऱ्यानुसार ७ लाख ६० हजार १६९ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

जळगाव जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी यंदा उस गाळपात सहभाग नोंदविला. त्यांनी १० फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ४८ हजार २६० मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी ९.५५ टक्‍के साखर उताऱ्यानुसार ३ लाख ३२ हजार ५५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद विभागातील आठ कारखान्यांवर कारवाई

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर थकीत एफआरपीप्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये औरंगाबाद विभागातील जवळपास आठ कारखान्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...