agriculture news in Marathi, cucumber at 300 to 3500 rupees in state, Maharashtra | Agrowon

राज्यात काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ३५०० रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 मार्च 2018

नागपूरला प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये

नागपूरला प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये
नागपूर ः येथील कळमणा बाजारात अपवाद वगळता काकडीचे व्यवहार १२०० ते १५०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. किरकोळ बाजारात काकडी २५ ते ३० रुपये किलोने विकल्या जात आहे. काकडीची बाजारातील सरासरी आवक १०० क्‍विंटलच्या घरात आहे. नागपूरच्या कळमणा बाजारात यवतमाळ, वर्धा, नागपूर परिसरांतून काकडीची आवक होते. मार्चच्या सुरवातीला १२०० ते १५०० रुपये क्‍विंटलचा दर काकडीला होता. १२ मार्चला ६०० ते ८०० रुपयाने काकडीचे व्यवहार झाले. त्यानंतर ८०० ते १२०० रुपये क्‍विंटल असा काकडीचा दर होता. यामध्ये अचानक तेजी येत २५ मार्चला हे दर ३५०० ते ४५०० रुपये क्‍विंटलवर पोचले. त्यानंतर ८०० ते १०००, ८०० ते १५०० रुपये क्‍विंटल असे काकडीचे दर राहिले.

सोलापुरात प्रतिक्विंटल ७०० ते १८०० रुपये
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात काकडीची आवक कमीच होती, पण मागणी चांगली असल्याने काकडीच्या दरात तेजी राहिली. काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १८०० व सरासरी १००० रुपये इतका दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात काकडीची रोज ४० ते १०० क्विंटलपर्यंत आवक झाली. काकडीला प्रति दहा किलोसाठी ७० ते १८० व सरासरी १०० रुपये दर मिळाला. त्या आधीच्या आठवड्यात रोज साधारणपणे ३० ते ५० क्विंटल आवक झाली. तर दर ८० ते १५० व सरासरी १२० रुपये, दर मिळाला, मार्चच्या पहिल्या आठवड्यातही साधारणपणे असेच दर होते. प्रतिदहा किलोसाठी ६० ते १६० सरासरी १०० रुपये असा दर होता.

अकोल्यात प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये
अकोला ः वाढत्या उन्हामुळे थंड समजली जाणाऱ्या काकडीची मागणी वाढत आहे. सध्या येथील भाजी बाजारात काकडीची ८०० ते १२०० रुपये दरम्यान क्विंटलला विक्री केली जात आहे. सरासरी १००० रुपयांचा दर मिळत आहे. गेल्या १५ दिवसांच्या तुलनेत काकडीच्या दरामध्ये किंचितशी वाढ झालेली असल्याचे व्यापारी सूत्रांचे म्हणणे होते. अकोला जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांमधून काकडीची सध्या आवक आहे. दीड ते दोन टनांपेक्षा अधिक काकडी विक्रीसाठी येत आहे. वाढलेल्या उन्हामुळे काकडीच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे दीडशे ते दोनशे रुपयांनी दर वाढले आहे. तर त्या तुलनेत आवक स्थिर आहे. येत्या काळात दरामध्ये आणखी वृद्धीची शक्‍यता आहे. काकडीची किरकोळ विक्री २० ते ३० रुपये दरम्यान प्रतिकिलोने केली जात आहे.

पुण्यात प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये
पुणे ः पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये काकडीच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदाच्या उन्हाळ्यात काकडीची बाजारातील आवक माेठ्या प्रमाणावर हाेत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २८) सुमारे १२ टेंपाेची आवक झाली हाेती. या वेळी क्विंटलला ६०० ते १००० रुपयांपर्यंत दर हाेता. ही आवक दरराेज एवढीच असून, उन्हाळ्यातील सरासरी आवकेच्या दुप्पट आवक असल्याचे ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले. उन्हाळ्यात काकडीला दहा किलाेला साधारण २०० रुपये मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याने, आणि उपलब्ध पाण्यावर ठिबक आणि मल्चिंग पेपरवर उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत केल्याने काकडीचे उत्पादन वाढले आहे. यामुळे काकडीची आवक माेठ्या प्रमाणावर हाेत असल्याचे निरीक्षण भुजबळ यांनी नाेंदविले.

जळगावात प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये
जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काकडीची आवक स्थिर असून, महिनाभरात दर  ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल यादरम्यान राहीले आहे. या महिन्याच्या सुरवातीला आवक अधिक होती. ती मागील पंधरवड्यात कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने सरासरी दर वाढ झाल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली. काकडीची आवक जळगाव तालुक्‍यासह जामनेर, एरंडोल, यावल आदी भागांतून होते. तिची मागणी किरकोळ बाजारात वाढली आहे. जळगाव येथील बाजारातून इतर भागांतही काकडीची पाठवणूक काही मोठे खरेदीदार करतात. मागणी कायम असल्याने दर स्थिर राहतील. तसेच पुढील काळात आवकेत   काहीशी घट येऊ शकते. कारण, सुरवातीच्या दरांचा लाभ फारसा न मिळाल्याने काकडीचे काही तोडे करून अनेक शेतकऱ्यांनी पीक काढून क्षेत्र रिकामे केले आहे. पुढे पुरवठा कमी होऊ शकतो, अशी माहिती मिळाली. 

परभणीत प्रतिक्विंटल  ३०० ते ४०० रुपये 
परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २९) काकडीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून काकडीची आवक येत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी काकडीची ४० ते ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ३०० ते ७०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २९) काकडीची ७० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपये होते, तर किरकोळ विक्री १० ते २० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

औरंगाबादेत प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये 
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २९) काकडीची ५५ क्‍विंटल आवक झाली. या काकडीला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये ३० जानेवारीला २४ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. १४ फेब्रुवारीला ५४ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. १७ फेब्रुवारीला २५ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २७ फेब्रुवारीला ४२ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २२ मार्चला १०९ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ३०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २४ मार्चला ७६ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ३०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २६ मार्चला काकडीची आवक ६४ क्‍विंटल तर दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २७ मार्चला ६७ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ४०० ते ७०० रुपये तर २८ मार्चला १२४ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विटंलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नगरमध्ये प्रतिक्विंटल ५०० ते १०५० रुपये
नगर ः नगर बाजार समितीत दर दिवसाला सत्तर ते शंभर क्विंटलपर्यंत आवक होत असते. मागील पंधरा दिवसांच्या तुलनेत काकडीची आवक स्थिर असली तरी दर मात्र काहीसे कमी झाले आहेत. बाजार समितीत सत्तर क्‍विंटल काकडीची आवक झाली आणि ५०० ते एक १०५० रुपयांचा दर मिळाला. नगर बाजार समितीत नगर जिल्ह्यासह सोलापूर, बीड, औरंगाबाद भागांतून काकडीची आवक होत असते. २२ मार्चला ७७ क्विंटलची आवक झाली. त्यादिवशी पाचशे ते एक हजार रुपयांचा व सरासरी साडेसातशे रुपयांचा दर मिळाला. १५ मार्चला ७६ क्विंटलची आवक झाली. त्यादिवशी पाचशे ते आकराशे व सरासरी आठशे रुपयांचा दर मिळाला. 
८ मार्चला आवक जरा कमी होती. त्यादिवशी ४४ क्विंटलची आवक होऊन एक हजार ते तेराशे रुपयांचा व सरासरी आकराशे पन्नास रुपयांचा दर मिळाला. १ मार्चला ३३ क्विंटलची आवक झाली. त्या वेळी पाचशे ते बाराशे रुपयांचा दर मिळाला. 
उन्हाळ्यामुळे काकडीला मागणी वाढली आहे. आवकही बऱ्यापैकी होत आहे. मात्र दर स्थिर आहेत असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

सांगलीत प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये 
सांगली ः येथील शिवाजी मंडईत काकडीची आवक कमी अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. गुरुवारी (ता. २९) काकडीची ३०० क्रेट (२५ किलोचे एक क्रेट) आवक झाली असून, त्यास प्रति प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये असा दर होता. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. शिवाजी मंडईत मिरज, वाळवा, पलूस तालुक्‍यातून काकडीची आवक होते. गत सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात काकडीची ५० क्रेटने आवक कमी झाली आहे. यामुळे काकडीच्या दरात वाढ झाली आहे. पुढील सप्ताहात काकडीचे दरात वाढ होण्याची शक्‍यता व्यापारी वर्गाने वर्तविली आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...