परभणीत काकडी प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये

काकडी
काकडी

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.५) काकडीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. वाटाण्याची ६० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाले. पालेभाज्यामध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. मेथीच्या ४० हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा १५० ते ३०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाले. वांग्याची ५० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. ढोबळी मिरचीची ७ क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले.  टोमॅटोची ६००क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपये दर मिळाले. भेंडीची ७ क्विंटल आवक असतांना १८०० ते २५०० रुयये प्रतिक्विंटल दर मिळाले. फ्लाॅवरची ६० क्विंटल आवक झाली असतांना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोबीची ७० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. गाजराची ९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाले. बीट रुट ची १० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. लिंबाची ५० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. पपईची ४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० त १००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com