agriculture news in marathi, Curiosity for Excellent ideal village from Maharashtra | Agrowon

यंदाच्या 'उत्कृष्ट आदर्श गावा'विषयी उत्सुकता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जानेवारी 2018

९ एप्रिलपूर्वीच निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता  
पुणे : आदर्श गाव योजनेत सहभागी झालेल्या गावांच्या निवडीची प्रक्रिया यंदा लवकरच सुरू होणार आहे. राज्याचा ''उत्कृष्ट आदर्श गाव पुरस्कार'' यंदा कोणत्या गावाला मिळतो याबाबत ग्रामपंचायतींचे लक्ष लागून आहे.

९ एप्रिलपूर्वीच निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता  
पुणे : आदर्श गाव योजनेत सहभागी झालेल्या गावांच्या निवडीची प्रक्रिया यंदा लवकरच सुरू होणार आहे. राज्याचा ''उत्कृष्ट आदर्श गाव पुरस्कार'' यंदा कोणत्या गावाला मिळतो याबाबत ग्रामपंचायतींचे लक्ष लागून आहे.

जलसंधारणात काम करणाऱ्या विविध घटकांसाठी राज्य शासनाकडून ४६० प्रकारचे पुरस्कार दिले जातात. तसेच पुरस्कार राज्यात आदर्शगाव चळवळीत कामे करणाऱ्या घटकांसाठीदेखील सुरू करावेत, असा प्रस्ताव ‘आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती’चे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी शासनासमोर मांडला होता. श्री. पवार यांचा प्रस्ताव स्वीकारून उत्कृष्ट आदर्श गावांसाठीदेखील पुरस्कार निर्णय यंदा शासनाने घेतला आहे.
जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह पोपटराव पवार तसेच जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीकडून ''उत्कृष्ट आदर्श गाव'' घोषित केले जाणार आहे. ९ एप्रिलच्या पूर्वीच ही निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे गावागावांमध्ये विकासाची स्पर्धा वाढीस लागेल, असे आदर्श गाव समितीचे म्हणणे आहे.

"राज्यात यंदाचा पहिला उत्कृष्ट आदर्शगाव पुरस्कार मिळवणाऱ्या गावाला पाच लाख रुपये मिळणार आहेत. द्वितीय क्रमांकाच्या गावाला तीन लाखाचा तर तृतीय क्रमांकाच्या गावाला दोन लाखाचा पुरस्कार दिला जाईल. आदर्श गावासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन संस्थांनादेखील पुरस्कार दिले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. आदर्श गाव होण्यासाठी परिश्रम घेणारे ग्राम कार्यकर्ते आणि ग्रामस्तरीय शासकीय कर्मचाऱ्यांना आदर्शगाव पुरस्कार योजनेत गौरविण्यात येणार आहे. "या पुरस्कार योजनेतील पात्रतेच्या अटी अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात ग्रामपंचायतींना नियमावली पाठविली जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाकडून ''उत्कृष्ट आदर्श गाव'' निवडताना काटेकोर नियम लावले जाणार आहेत. मागील तीन वर्षांत ५० टक्के ग्रामसभा तहकूब असल्यास अशा गावाची निवड पुरस्कारासाठी होणार नाही. मागील तीन वर्षांत ग्रामविकासाची सप्तसूत्री राबविलेले, दहा हजार मनुष्यदिवस श्रमदान केलेले व तंटामुक्त असलेले, परंतु पाणलोट विकासाची ८० टक्के कामे केलेल्या गावाला राज्याचे ''उत्कृष्ट आदर्श गाव'' होण्याची संधी आहे.

इतर बातम्या
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरमध्ये आज...नांदेड : लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
‘महाबीज’तर्फे बीजोत्पादनासाठी आगाऊ...जळगाव : आगामी खरिपासाठी सोयाबीन, उडीद, मूग, ताग,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यावर संकटनाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
पेमेंट न मिळाल्याने वसाकाच्या ऊस...नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...