agriculture news in Marathi, Currant rate increased, Maharashtra | Agrowon

बेदाण्याला दराची गोडी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मार्च 2019

यंदा चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार झाला आहे, दरही चांगले मिळत आहेत. यंदाच्या हंगामात बेदाण्याचे दर स्थिर राहतील असा अंदाज आहे.
​- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

सांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची मागणी वाढल्याने गेल्या आठवड्यात बेदाण्याला १३५ ते १७५ रुपये असा दर मिळाला. गेल्या आठवड्यापेक्षा १० ते १५ रुपयांची वाढ झाली असून, बेदाण्याला प्रतिकिलोस सरासरी १४५ ते १९० रुपये असा दर मिळ आहे. तासगावच्या बाजारपेठेत दर्जेदार बेदाण्याची आवक होत आहे. यंदा बेदणा उत्पादनात १० हजार ते १५ हजार टन वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाचा हंगाम उत्पादकांना गोडी देणारा ठरत आहे.

यंदा बेदाणानिर्मितीसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यातच द्राक्षाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळले आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादनात यंदा १० हजार ते १५ हजार टन वाढीची शक्यता आहे. बेदाणा हंगाम सुरू झाल्यापासून दर वधारले आहेत. त्यामुळे बेदाणा उत्पादकांना दिलासा मिळाला. राज्यात दरवर्षी सरासरी १ लाख ६० हजार ते १ लाख ८० हजार टन बेदाण्याचे उत्पादन होते. यंदा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जगविल्या. त्यातच एकाच वेळी द्राक्षे विक्रीला आल्याने सुरवातीच्या काळात अपेक्षित दर नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीला प्राधान्य दिले.
 
२०१६-१७ मध्ये १ लाख ८० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी ऐन हंगामात अवकाळी पावसाने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे बेदाण्याचे उत्पादन १ लाख ६० हजार टन झाले होते. म्हणजेच २० हजार टन उत्पादन कमी झाले होते. परिणामी बेदाण्याचे दर वराधले, त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाण्याची विक्री केली असल्याने शीतगृहात बेदाणा शिल्लक राहिला नाही. 

आवक, मागणीही वाढली 
गेल्या महिन्याभरात तासगाव बाजार समितीत सुमारे ७०० ते ८०० टन बेदाण्याची आवक आणि विक्री होत होती. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची आवक वाढली आहे. सध्या बाजार समितीत ९०० ते १००० टन बेदाण्याची आवक होऊ लागली आहे. दर्जेदार बेदाणा विक्रीसाठी येऊ लागल्याने बेदाण्याला मागणी वाढली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बेदाण्याचे दर (रुपये, प्रतिकिलो)
हिरवा    १४५ ते १९०
पिवळा    १४० ते १८० 
काळा    ६० ते ९५
 

इतर अॅग्रो विशेष
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...