agriculture news in marathi, Current water level in key reservoirs | Agrowon

देशाचा धरणसाठा 69 टक्‍क्‍यांपर्यंत
पीटीआय
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : देशातील 91 प्रमुख जलाशयांमध्ये 2 नोव्हेंबरअखेर एकूण क्षमतेच्या सरासरी 69 टक्‍क्‍यांपर्यंत पाणीसाठा होता, असे केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) सांगितले. 26 ऑक्‍टोबरपर्यंत या पाणीसाठ्याचे प्रमाण 70 टक्के होते. तुलनेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 1 टक्‍क्‍याने घट झाली आहे.

नवी दिल्ली : देशातील 91 प्रमुख जलाशयांमध्ये 2 नोव्हेंबरअखेर एकूण क्षमतेच्या सरासरी 69 टक्‍क्‍यांपर्यंत पाणीसाठा होता, असे केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) सांगितले. 26 ऑक्‍टोबरपर्यंत या पाणीसाठ्याचे प्रमाण 70 टक्के होते. तुलनेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 1 टक्‍क्‍याने घट झाली आहे.

"सीडब्ल्यूसी'द्वारा देशातील प्रमुख धरणसाठ्यांचा साप्ताहिक आढावा घेतला जातो. 2 नोव्हेंबरअखेर 91 प्रमुख जलाशयांत सरासरी 108.372 अब्ज घनमीटर (बीसीएम) पाणीसाठा होता. या धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता 157.799 अब्ज घनमीटर आहे. देशाचे एकूण अंदाजित पाणीसाठ्याचे प्रमाण 252.388 अब्ज घनमीटर आहे. त्यानुसार या जलसाठ्यांची क्षमता 62 टक्के आहे.

क्षेत्रनिहाय पाणीसाठ्याची स्थिती ः

उत्तर भारत
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांतील 6 मोठ्या जलाशयांची एकूण क्षमता 18.01 अब्ज घनमीटर आहे. सध्या येथे 13.14 अब्ज घनमीटर साठा आहे. एकूण क्षमतेच्या हे प्रमाण 73 टक्के आहे. गतवर्षी या काळात हेच प्रमाण 67 टक्के होते.

पूर्व भारत
पूर्व भारतात झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांतील 15 धरणांची क्षमता 18.83 अब्ज घनमीटर आहे. येथील एकूण क्षमतेपैकी सध्या 14.81 म्हणजे 79 टक्के क्षमतेइतका पाणीसाठा आहे. गतवर्षी हे प्रमाण 84 टक्के होते.

पश्‍चिम भारत
पश्‍चिम भारतातील महाराष्ट्र व गुजरातसह इतर राज्यांमध्ये मिळून 27 धरणे आहेत. यामध्ये आतापर्यंत एकूण 20.57 अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. त्यांची 27.07 अब्ज घनमीटर क्षमता लक्षात घेतल्यास हे प्रमाण 76 टक्के आहे. गतवर्षी हेच प्रमाण 84 टक्के होते.

मध्य भारत
मध्य भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये एकूण 12 जलाशयांचा समावेश होतो. त्यांची एकूण क्षमता 42.30 अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. सध्या येथे 26.11 अब्ज घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून, एकूण क्षमतेच्या 62 टक्के प्रमाण आहे. गतवर्षी हेच प्रमाण 89 टक्के होते.

दक्षिण भारत
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूत एकूण 31 जलाशयांचा समावेश होतो. त्यांची एकूण क्षमता 51.59 अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. सध्या येथे 33.75 अब्ज घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून, एकूण क्षमतेच्या 65 टक्के प्रमाण आहे. गतवर्षी हेच प्रमाण 47 टक्के होते.

इतर अॅग्रो विशेष
काळी आई आणि तिच्या लेकरांवर प्रेम करा४ ऑगस्टच्या ‘अॅग्रोवन’मध्ये तीस वर्षे सतत फ्लॉवर...
युरियाचा वापर हवा नियंत्रितचपंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर राज्यात पावसाने दमदार...
कृषी आयुक्तांकडून डाळिंबावरील रोगाचा...सांगली ः राज्यातील आंबे बहारातील डाळिंबावर तेलकट...
केरळात पावसाचा जोर कमी; मदतकार्यात वेगतिरुअनंतपुरम/कोची  : दोन दिवसांपासून पावसाचा...
यवतमाळ जिल्ह्यात सोळा कृषी केंद्रांचे...यवतमाळ : कीटकनाशक खरेदी केलेल्या एजन्सीचे डीलरचे...
पिकं हातची गेली, शिवारात फक्त हिरवा पालापावसाचा खंड २२ ते २४ दिवसांचा राहिला. हव्या...
स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूर देशात दुसरेसोलापूर  : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८'...
खान्‍देशातील तीन प्रकल्प भरलेजळगाव : मागील आठवड्यात झालेल्या पावसाने खान्‍...
कापसातील कृत्रिम मंदीचा फुगा फुटलाजळगाव ः सरकीच्या वायदे बाजारातील सटोडियांनी...
गडचिरोली, नांदेडमध्ये दमदार पाऊस पुणे : विदर्भातील गडचिरोली, मराठवाड्यातील नांदेड...
‘ग्लायफोसेट’ धोकादायक की सुरक्षित? पुणे: अमेरिकेतील एका न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या...
अळिंबी उत्पादन, मूल्यवर्धन,...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा भात उत्पादनासाठी...
जिद्द द्राक्षबाग फुलवण्याची नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक...
मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भावपरभणी : सलग तीन आठवडे  पावसाचा खंड आणि...
पर्यावरणपूरक अक्षय ऊर्जा फायदेशीर देशात उपलब्ध अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपैकी...
अस्मानी कहरराज्यात जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा पहिला...
देशातील ५२ टक्के शेतकरी कुटुंबे...२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...