agriculture news in marathi, Current water level in key reservoirs of india | Agrowon

पूर्व, पश्चिम आणि मध्य भारतात पाणीसाठा कमी
वृत्तसेवा
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : देशातील ९१ प्रमुख जलाशयांमध्ये २३ नोव्हेंबरअखेर एकूण क्षमतेच्या सरासरी ६४ टक्‍क्‍यांपर्यंत पाणीसाठा होता, असे केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) सांगितले. गेल्या आठवड्यात १६ नोव्हेंबरपर्यंत या पाणीसाठ्याचे प्रमाण ६६ टक्के होते. तुलनेत पाणीसाठ्यात २ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. ही घट प्रामुख्याने पूर्व, पश्चिम आणि मध्य भारतातील जलसाठ्यांत आहे.

नवी दिल्ली : देशातील ९१ प्रमुख जलाशयांमध्ये २३ नोव्हेंबरअखेर एकूण क्षमतेच्या सरासरी ६४ टक्‍क्‍यांपर्यंत पाणीसाठा होता, असे केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) सांगितले. गेल्या आठवड्यात १६ नोव्हेंबरपर्यंत या पाणीसाठ्याचे प्रमाण ६६ टक्के होते. तुलनेत पाणीसाठ्यात २ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. ही घट प्रामुख्याने पूर्व, पश्चिम आणि मध्य भारतातील जलसाठ्यांत आहे.

"सीडब्ल्यूसी'द्वारा देशातील प्रमुख धरणसाठ्यांचा साप्ताहिक आढावा घेतला जातो. २३ नोव्हेंबरअखेर ९१ प्रमुख जलाशयांत सरासरी १०१.०७७ अब्ज घनमीटर (बीसीएम) पाणीसाठा होता. या धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १५७.७९९ अब्ज घनमीटर आहे. देशाचे एकूण अंदाजित पाणीसाठ्याचे प्रमाण २५३.३८८ अब्ज घनमीटर आहे. त्यानुसार या जलसाठ्यांची क्षमता ६२ टक्के आहे.

क्षेत्रनिहाय पाणीसाठ्याची स्थिती ः

उत्तर भारत
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांतील ६ मोठ्या जलाशयांची एकूण क्षमता १८.०१ अब्ज घनमीटर आहे. सध्या येथे १२.१८ अब्ज घनमीटर साठा आहे. एकूण क्षमतेच्या हे प्रमाण ६८ टक्के आहे. गतवर्षी या काळात हेच प्रमाण ६० टक्के होते.

पूर्व भारत
पूर्व भारतात झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांतील १५ धरणांची क्षमता १८.८३ अब्ज घनमीटर आहे. येथील एकूण क्षमतेपैकी सध्या १४.४३ म्हणजे ७७ टक्के इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी हे प्रमाण ८२ टक्के होते.

पश्‍चिम भारत
पश्‍चिम भारतातील महाराष्ट्र व गुजरातसह इतर राज्यांमध्ये मिळून २७ धरणे आहेत. यामध्ये आतापर्यंत एकूण १९.६३ अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. त्यांची २७.०७ अब्ज घनमीटर क्षमता लक्षात घेतल्यास हे प्रमाण ७३ टक्के आहे. गतवर्षी हेच प्रमाण ८० टक्के होते.

मध्य भारत
मध्य भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये एकूण १२ जलाशयांचा समावेश होतो. त्यांची एकूण क्षमता ४२.३० अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. सध्या येथे २४.५८ अब्ज घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून, एकूण क्षमतेच्या ५८ टक्के प्रमाण आहे. गतवर्षी हेच प्रमाण ८४ टक्के होते.

दक्षिण भारत
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूत एकूण ३१ जलाशयांचा समावेश होतो. त्यांची एकूण क्षमता ५१.५९ अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. सध्या येथे ३०.२७ अब्ज घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून, एकूण क्षमतेच्या ५९ टक्के प्रमाण आहे. गतवर्षी हेच प्रमाण ४२ टक्के होते.

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...