agriculture news in marathi, Custard apple season ends in a short time | Agrowon

अल्पावधीतच संपला सीताफळाचा हंगाम
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

नागपूर : वातावरणातील बदलाचा यावर्षी सीताफळाच्या हंगामाला चांगलाच फटका बसला. वातावरणात उकाडा वाढल्याच्या परिणामी महिनाभरापूर्वीच सीताफळ हंगाम संपला असून, उत्पादकांना यावर्षी अपेक्षित दर मिळू शकला नाही.

कोरडवाहू पीक म्हणून राज्यात सीताफळाखालील क्षेत्र लगतच्या काळात वाढीस लागले आहे. सुमारे ७० हजार हेक्‍टरवर आज राज्यात सीताफळ लागवड होते. विदर्भात हे क्षेत्र ७ हजार हेक्‍टरवर आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, नागपूर, वर्धा हे जिल्हे सीताफळासाठी प्रसिद्ध आहेत.

नागपूर : वातावरणातील बदलाचा यावर्षी सीताफळाच्या हंगामाला चांगलाच फटका बसला. वातावरणात उकाडा वाढल्याच्या परिणामी महिनाभरापूर्वीच सीताफळ हंगाम संपला असून, उत्पादकांना यावर्षी अपेक्षित दर मिळू शकला नाही.

कोरडवाहू पीक म्हणून राज्यात सीताफळाखालील क्षेत्र लगतच्या काळात वाढीस लागले आहे. सुमारे ७० हजार हेक्‍टरवर आज राज्यात सीताफळ लागवड होते. विदर्भात हे क्षेत्र ७ हजार हेक्‍टरवर आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, नागपूर, वर्धा हे जिल्हे सीताफळासाठी प्रसिद्ध आहेत.

१० ऑक्‍टोबरपासून सीताफळाचा हंगाम सुरू होत नोव्हेंबरअखेरपर्यंत फळे मिळतात. यावर्षी ९ ऑक्‍टोबरपासून फळ मिळण्यास सुरवात होत, २७-२८ ऑक्‍टोबरलाच हंगाम संपला. परिणामी एकाच वेळी फळे बाजारात आल्याने अपेक्षित दर सीताफळ उत्पादकांना मिळाला नाही.

यावर्षी अधिक काळ पाऊस असल्याने जमिनीत ओलावा वाढला आणि ढगाळ वातावरणामुळे फळे लवकरच परिपक्‍व झाली. दुपारी वातावरणात उकाडा वाढून त्यानंतर पाऊस पडत होता. वातावरणातील या बदलामुळेच सीताफळ बाजारात लवकर आली आणि हंगामदेखील लवकर संपुष्टात आला.

यावर्षी चांगल्या प्रतीच्या सीताफळाला ७५ ते ८०, त्याखालोखाल दर्जा असलेल्या फळांना ३५ ते ४५ व त्यानंतरच्या फळांना २५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. आता एका जिल्ह्यातील बाजारात सरासरी ७०० ते ८०० क्रेट आवक पाहिजे. सद्यःस्थितीत केवळ १०० क्रेटची आवक होत आहे. अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ या सीताफळाच्या मोठ्या बाजारपेठा आहेत.

सीताफळ नाशवंत असल्याने तोडणीनंतर चार दिवसांत ते ग्राहकांपर्यंत पोचले पाहिजे. यावर्षी वातावरणातील बदलाचा फटका बसत सीताफळ हंगाम लवकर संपुष्टात आला. गेल्या २५ ते ३० वर्षांत असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.
- श्याम गट्टाणी, अध्यक्ष, सीताफळ महासंघ

 

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...